पुणे : अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर छापा; नेमकं काय सापडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय सल्लागार नरेश अरोडा यांच्या 'डिझाइन बॉक्स्ड' या कंपनीच्या पुण्यातील कार्यालयावर मंगळवारी क्राइम ब्रँचने छापेमारी केली. नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या फक्त दोन दिवस आधी ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर छापा

अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर छापा

मुंबई तक

• 10:24 AM • 14 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर छापा

point

छापेमारीत नेमकं काय सापडलं?

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या 'डिझाइन बॉक्स्ड' या कंपनीच्या पुण्यातील कार्यालयावर मंगळवारी क्राइम ब्रँचने छापेमारी केली. नगर निगम निवडणुकीच्या फक्त दोन दिवस आधी ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केलं की, छापेमारीदरम्यान काहीच आपत्तिजनक साहित्य किंवा अनियमितता आढळली नाही.  

हे वाचलं का?

'डिझाइन बॉक्स्ड' ही एक क्रिएटिव्ह पॉलिटिकल डिजिटल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी असून, ती NCP साठी काम करते. सध्याच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सुद्धा या कंपनीने एनसीपीचा डिजिटल प्रचार सांभाळला होता. संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर क्राइम ब्रँचने वाकडेवाडी-शिवाजीनगर परिसरातील या कंपनीच्या कार्यालयात एक अधिकारी आणि दोन पोलिस कर्मचारी यांची टीम पाठवली होती. 

पोलीस आयुक्तांनी दिली माहिती 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, "पुणे कमिशनरेटच्या हद्दीत संशयास्पद हालचाल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे तात्काळ तपासासाठी टीम पाठवण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कार्यालयात किंवा तेथील कर्मचाऱ्यांकडे काहीच आपत्तिजनक आढळलं नाही.” 

हे ही वाचा: अश्लील डान्स पाहण्यात अधिकारी दंग... PCS अधिकाऱ्यासह तीन पोलिसांची मस्ती, पैसे उडवतानाचा व्हिडीओ व्हायरल

अजित पवारांनी X वरून काय सांगितलं 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी X वरून या घटनेची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, "क्राइम ब्रँचच्या टीमने नरेश अरोरा आणि डिझाइन बॉक्स्डच्या पुणे कार्यालयात काही माहिती घेण्यासाठी भेट दिली होती. आम्ही सर्व आवश्यक माहिती दिलीआणि पूर्ण सहकार्य केलं. यामध्ये कोणतीही अनियमितता किंवा आपत्तिजनक बाब आढळली नाही. एनसीपी नरेश अरोरा आणि डिझाइन बॉक्स्डसोबत ठामपणे उभी आहे. आम्ही कायद्याचा पूर्ण आदर करतो आणि सर्व प्रक्रियांमध्ये सहकार्य करण्यास तयार आहोत." 

हे ही वाचा: प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग; पतीने पोलीस ठाण्यातच पत्नीवर झाडली गोळी अन्...

नरेश अरोरा यांनी पत्रकार परिषदेत केलं स्पष्ट   

डिझाइन बॉक्स्डचे व्यवस्थापकीय संचालक नरेश अरोरा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, छापेमारीच्या वेळी ते आणि इतर वरिष्ठ कर्मचारी एनसीपीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये व्यस्त होते. त्यामुळे स्टाफने पोलिसांना उपलब्ध माहिती दिली. पोलिसांनी काही दस्तऐवज आणि फोन नंबर मागितले, मात्र सीनियर उपस्थित नसल्याने ते देऊ शकत नसल्याचं स्टाफने सांगितलं. पोलिसांनी स्टाफला त्यांचा फोन नंबर दिला असून, कंपनीकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे." या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले की ही कारवाई केवळ माहिती पडताळणीसाठी होती आणि त्यात काहीच गैर आढळले नाही.

    follow whatsapp