अश्लील डान्स पाहण्यात अधिकारी दंग... PCS अधिकाऱ्यासह तीन पोलिसांची मस्ती, पैसे उडवतानाचा व्हिडीओ व्हायरल
एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर होत असताना उपविभागीय अधिकारी (SDO) आणि पोलिसांची उपस्थिती असल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अश्लील डान्स पाहण्यात अधिकारी दंग...
कार्यक्रमात PCS अधिकाऱ्यासह तीन पोलिसांची मस्ती
पोलिसांचा पैसे उडवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Crime News: छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर होत असताना उपविभागीय अधिकारी (SDO) आणि पोलिसांची उपस्थिती असल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या प्रकरणात, SDO ला त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
हे संपूर्ण प्रकरण गरियाबंद जिल्ह्यातील देवभोग पोलीस स्टेशन हद्दीत आयोजित केलेल्या एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाशी संबंधित आहे. मागील आठवड्यातच, उरमाल गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमात अश्लील नृत्य सादरीकरण सुद्धा झालं आणि रविवारी या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये कार्यक्रमात SDO आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. इतकेच नव्हे तर, अश्लील डान्स बघण्यासोबत ते पैसे उडवताना आणि व्हिडीओ रेकॉर्ड करताना देखील दिसून आले. या फोटो आणि व्हिडीओमुळे प्रकरण अधिक चर्चेत आलंय.
हे ही वाचा: Govt Job: भारतीय हवाई दलात मोठी भरती! 'या' पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू... काय आहे पात्रता?
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
गरियाबंदचे जिल्हाधिकारी भगवान सिंह उइके यांनी माध्यमांना माहिती दिली की, राज्य प्रशासकीय सेवा (PCS) अधिकारी असलेले SDO (महसूल) तुलसीदास मरकम यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं आहे. पुढे ते म्हणाले की, तपास पूर्ण झाल्यानंतर, अहवाल रायपूर विभागीय आयुक्तांना पाठवला जाईल. त्यानंतर नियमांनुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. शो-कॉज नोटिसनुसार, संबंधित अश्लील नृत्य कार्यक्रम 5 जानेवारी ते 9 जानेवारी असे चार दिवस सुरू होता. दरम्यान, या कार्यक्रमातील SDO चे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
हे ही वाचा: आंतरजातीय प्रेमविवाह, 8 महिन्यांचा मुलगा... पण शेवटी वडिलांनीच मुलीचा संसार केला उद्धवस्त! नेमकं काय घडलं?
14 आयोजकांना अटक
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणासंबंधी FIR दाखल करण्यात आला असून कार्यक्रमाच्या आयोजन समितीच्या 14 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नियमांचं पालन न केल्याप्रकरणी आणि अश्लील कार्यक्रम आयोजित केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली गेली आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर बेशिस्तपणा तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आता, पोलीस विभागाने त्यांच्याविरुद्ध विभागीय कारवाई सुरू केली आहे.










