Govt Job: भारतीय हवाई दलात मोठी भरती! 'या' पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू... काय आहे पात्रता?
इंडिअन एअरफोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलाकडून 'अग्निवीर वायु INTAKE 01/2027' पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जानेवारी 2026 रोजी सुरू झाली असून उमेदवार 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवाई दलात मोठी भरती!
'या' पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू...
काय आहे पात्रता आणि वयोमर्यादा?
Govt Job: भारतीय हवाई दलात सहभागी होऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडिअन एअरफोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलाकडून 'अग्निवीर वायु INTAKE 01/2027' पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जानेवारी 2026 रोजी सुरू झाली असून उमेदवार 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
भारतीय हवाई दलाच्या या भरतीमध्ये अविवाहित तरुण आणि तरुणी सहभागी होऊ शकतात. संबंधित पदांसाठी भरती करण्यासाठी उमेदवार iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इंटरमीजिएट/ 10+2 वी किंवा समतुल्य परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांत किमात 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच, इंग्रजी विषयात सुद्धा किमान 50 टक्के गुण असणं गरजेचं आहे. तसेच, मॅकेनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ कंप्यूटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांत तीन वर्षांचा इंजीनिअरिंग डिप्लोमा किंवा भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स असणं गरजेचं आहे. विज्ञान व्यतिरिक्त इतर स्ट्रीममधून 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा अप्लाय करू शकतात.
वयोमर्यादा
अर्जदारांची जन्मतारीख 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी सर्व टप्पे क्लिअर केल्यास कमाल वयोमर्यादा 21 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.










