प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग; पतीने पोलीस ठाण्यातच पत्नीवर झाडली गोळी अन्...
पोलीस कोठडीत असलेल्या एका 35 वर्षीय महिलेची तिच्या पतीने दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याचं वृत्त आहे. घटनेनंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नी गेली प्रियकरासोबत पळून...
पतीने पोलीस ठाण्यातच पत्नीवर झाडली गोळी
Crime News: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका 35 वर्षीय महिलेची तिच्या पतीने दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याचं वृत्त आहे. संबंधित घटना बानगी पोलीस स्टेशन परिसरात घडली. घटनेतील पीडित महिलेचं नाव सोनी असून तिच्या पतीचं नाव अनूप असल्याची माहिती आहे. घटनेनंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, रामापूर अटरिया गावातील रहिवासी असलेला अनूप आणि त्याची पत्नी सोनी दोघे गुरुग्राममध्ये काम करत होते. तिथे सुरजीत नावाच्या एका तरुणासोबत सोनीची ओळख झाली आणि त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अनूपला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळताच त्याने सोनीला त्याच्या गावी सोडलं. परंतु, 7 जानेवारी रोजी सोनी तिचा प्रियकर सुरजीतसोबत घरातून पळून गेली. अनूपने याप्रकरणी सुरजीतविरुद्ध FIR दाखल केली होती.
अनूपने केलेल्या आरोपानुसार, सोनी तिच्यासोबत तिचे दागिने आणि घरातील 35,000 रुपये रक्कम घेऊन गेली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत सोनीला रविवारी ताब्यात घेतलं आणि सोमवारी सकाळी तिला कोर्टात सादर करण्याची तयार सुरू होती. सकाळी जवळपास 10.45 वाजता एक महिला कॉन्स्टेबल सोनीला पोलीस ठाण्याच्या कॅन्टीनच्या दिशेने घेऊन जात होती. तिथे सोनीचे नातेवाईक आणि पती अनूप तिला समजवण्यासाठी आले होते.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मध्य रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! CSMT-कल्याण मार्गावर धावणार 'ही' खास लोकल... आता प्रवास अधिक सुरक्षित
राग अनावर होताच पत्नीवर गोळी झाडली अन्...
दरम्यान, अनूपचा राग अनावर झाला आणि संधी मिळताच त्याने सोनीवर बेकायदेशीर पिस्तूसने गोळी झाडली. गोळी झाडण्याचा आवाज येताच, परिसरात एकच खळबळ उडाली. गोळी लागल्यानंतर, सोनी रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. त्यावेळी, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनूप आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी घेरलं आणि घटनास्थळावरूनच त्याला ताब्यात घेण्यात आलं. हत्येत वापरण्यात आलेलं हत्यारसुद्धा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.










