मुंबईची खबर: मध्य रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! CSMT-कल्याण मार्गावर धावणार 'ही' खास लोकल... आता प्रवास अधिक सुरक्षित

मुंबई तक

पीक आवर्समधील गर्दीमुळे लोकल ट्रेनचा प्रवास हा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित (ऑटोमॅटिक) दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

CSMT-कल्याण मार्गावर धावणार 'ही' खास लोकल...
CSMT-कल्याण मार्गावर धावणार 'ही' खास लोकल...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मध्य रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

point

CSMT-कल्याण मार्गावर धावणार 'ही' खास लोकल...

point

आता प्रवास होणार अधिक सुरक्षित

Mumbai News: लोकल ट्रेनचा प्रवास हा मुंबईकरांसाठी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग ठरला आहे. पीक आवर्समधील गर्दीमुळे लोकल ट्रेनचा प्रवास हा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित (ऑटोमॅटिक) दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच अशी ट्रेन तयार करण्यात आली असून लवकरच याचं ट्रायल रन सुरू होईल. 

मध्य रेल्वे मुंबईतील पहिली स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन-एसी लोकल ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे, मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये चांगला बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या अपघातानंतर, रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्या घटनेमुळे, गर्दीच्या वेळेत उघड्या दरवाज्यांमुळे आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा मुद्दा समोर आला. 

हे ही वाचा: Govt Job: भारतीय हवाई दलात मोठी भरती! 'या' पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू... काय आहे पात्रता?

स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन एसी लोकल... 

सर्वात आधी या नव्या रेकचा फोटो एका 'X' यूजरने शेअर केला होता. त्यानंतर, दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये चांगलीच चर्चा झाली. या फोटोमघ्ये बंद दरवाजे असलेले कोच स्पष्टपणे दिसत आहेत. स्वयंचलित दरवाज्यांचं हे वैशिष्ट्य केवळ AC लोकल ट्रेनमध्येच पाहायला मिळत होतं. मात्र, आता स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन-एसी लोकल ट्रेन तयार करण्यात आली असून लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी तिचं ट्रायल केलं जाईल. ऑटोमॅटिक बंद दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेनचं ट्रायल CSMT ते कल्याण मार्गावर होण्याची शक्यता आहे. हा मार्ग मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. 

हे ही वाचा: अश्लील डान्स पाहण्यात अधिकारी दंग... PCS अधिकाऱ्यासह तीन पोलिसांची मस्ती, पैसे उडवतानाचा व्हिडीओ व्हायरल

ट्रायल रनदरम्यान, गर्दीच्या वेळी दरवाजाचे ऑपरेशन, व्हेंटिलेशन सिस्टम, प्रवाशांची हालचाल आणि एकूण प्रवास परिस्थिती लक्षात घेतली जाईल. या चाचण्यांमधून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे, इतर मार्गांवर अशाच लोकल ट्रेन सुरू करायच्या की नाही यावर निर्णय घेतला जाईल. मुंब्रा येथे झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेत गर्दी असलेल्या ट्रेनमधून खाली पडून प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे उघड्या दरवाज्याजवळ उभे राहून चालत्या ट्रेनमधून बाहेर पाहण्याचे धोके अधोरेखित झाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp