Vaishna Hagawane Audio Recording : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आता मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. या प्रकरणात समोर आलेल्या एका ऑडिओ रेकॉर्डींगमुळे आता हगवणे कुटुंब आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता वैष्णवीने ही मृत्यूच्या काही दिवस आधी तिच्या मैत्रीणीशी साधलेल्या संवादाची ऑडीओ क्लिप समोर आली आहे. यावेळी शशांक हगवणे सोबत प्रेमविवाह करणं हीच माझी सर्वात मोठी चूक आहे असं वैष्णवीने मैत्रिणीजवळ बोलून दाखवलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> वैष्णवी आई होणार म्हटली, तेव्हा शशांक हगवणेने चरित्र्यावर संशय... 2023 मध्ये काय घडलं होतं?
वैष्णवीने आपल्याला सासरच्यांकडून होत असलेला सगळा त्रास आपल्याला मैत्रिणीला बोलून दाखवला होता. वैष्णवी म्हणाली होती की, मी हे लग्न करुन खूप मोठी चूक केली. पण आता मला ही चूक सुधारायची आहे. माझ्या वडिलांना मी हे सांगितलंय, ते मला ही चूक सुधारायला मदत करणार आहेत.
वैष्णवीने मैत्रिणीला पाठवलेली रेकॉर्डींग काय?
पहिला व्हॉईस मेसेज : "मला पिंकीताई म्हणे,'तुझी सगळीकडे बदनामी करते. तू जे केलं, नाही केलं ते सगळं तुझ्या मैत्रीणींना सांगेल. तू फालतू आहेस, घाणेरडी आहेस, एखाद्याच्या घराचं वाटोळं करते. शशांकसोबतही लॉयल नव्हती."
दुसरा व्हॉईस मेसेज : "दाजी (शशांक) बघत होते मला मारताना, नंतर त्यांनीही माझ्यावर हात उचलला. कारण हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी ठरवलंय की डिव्होर्स देणार आहे. मी सांगितलंय पप्पाला. पप्पा म्हटले आपण करु यावर विचार..."
तिसरा व्हॉईस मेसेज: "माझा नवरा... मला एवढं आश्चर्य वाटतंय, माझा नवराच कधी माझा नाही झाला. सासू-सासऱ्यांचं कामंच असतं असं वागायचं. पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेलेना...मी खूप चुकले. सगळ्यांना विरोध करुन मी त्याच्यासोबत लग्न करुन खूप मोठी चूक केली." असं वैष्णवी म्हणाली होती.
तिथंच चूक झाली माझी"
चौथा व्हॉईस मेसेज : "सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडे गेलंय. तुला ही छोटी गोष्ट वाटते का हे सगळं सांगण्याच्या पलीकडे आहे.मी माझ्या आयुष्यात कधी इमॅजीन नव्हतं केलं. ती एवढी घाण बोललीय ना. मी आता विचारच नाही करू शकत"
ऑडीओ शेअर करण्यापूर्वी काय चॅटींग झाली?
वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की, "मी डीव्हॉर्स घ्यायचा विचार करतेय. मी त्या माणसासोबत खूष नाही. मला खूप झालाय. यावेळी हाईट झाली. त्यांच्या घरच्यांनी मला मारलं, त्यांनीही मारलं. मी राहूच शकत नाही त्यांच्या घरी, खूप वैतागलेय मी."
हे ही वाचा >> ज्योती मल्होत्राचा कबुलीनामा! पाकिस्तानात कधी, कुठे आणि काय केलं... यंत्रणांना मिळाली महत्वाची माहिती
मैत्रिणीने चॅटींगवर कारण विचारलं असता, "वैष्णवीने सांगितलं की, "तेच कामवालीचं मॅटर. तिची लफडी बाहेर आली. मावशीनं मला बरंच सांगितलं होतं फॅमिलीबद्दल. मग त्यांचं असं म्हणणं होतं की, मी साथ दिली. मीच वाटोळं केलं असं ते म्हणून लागल्या. पण माझा याच्यात काहीही संबंध नव्हता. मी आता घरी आलेय आणि फादर खूप चिडलेत."
दरम्यान,अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून असलेल्या वैष्णवी शशांक हगवणेने 16 मे रोजी आत्महत्या केली. या प्रकरणाने पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, वैष्णवीच्या आत्महत्येमागे हुंड्याचा छळ आणि कौटुंबिक हिंसाचार असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक हगवणे याला पोलिसांनी अटक केली. तर सासरे राजेंद्र हगवणे फरार झाले आहेत.
ADVERTISEMENT
