Vasai Crime News : ‘मी शंकर आहे असून तू माझी पार्वती आहे', असे सांगून एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेष वैद्य याच्याविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या प्रवाशांचा विकेंडला हिरमोड
फेसबुकवर ओळख आणि भेटायला बोलवून अत्याचार
पीडित महिला 35 वर्षांची असून पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, 2023 मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला. मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती आहेस असे सांगून तिला भुलवले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या काळात वैद्य याने तिच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्रे काढली होती.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचं दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता, महत्त्वाचा अलर्ट
धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप
या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावले. मे 2025 मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये पीडित महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हे नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्याने हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. ऋषिकेश वैद्य याने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











