मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या प्रवाशांचा विकेंडला हिरमोड
पुण्याची गोष्ट : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीनंतर घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता फिरायला गेलेल्या प्रवाशांचा मोठा हिरमोड झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी
सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचा हिरमोड
पुण्याची गोष्ट : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याआधी देखील दोन दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीनंतर घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लावण्यात आल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे सध्या घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या किमान 5 किमी अंतरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा : डोंबिवलीत लेकीचं लग्न जुळत नव्हतं म्हणून बापानं भोंदू बाबाला गाठलं, दोष दूर करण्याच्या नावाखाली भलतंच कांड...
सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचा हिरमोड
वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. अनेक प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं चित्र आहे. प्रवासी गाडीतून उतरून रस्त्यावर आले आहेत. परिस्थिती कशी सुरळीत होईल याकडे त्यांचं लक्ष आहे. रामनवमीचा दिवस हा सुट्टीचा दिवस असल्याने प्रवासी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले, पण प्रवाशांचा हिरमोड झाल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा : धार्मिक भावना! दर गुरुवारी मांस विक्री बंद, 5 हजारांच्या दंडाची तरतूद; महाराष्ट्रातील कोणत्या नगरपरिषदेने घेतला निर्णय?
संबंधित महामार्ग हा मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा देशातील अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. विशेष म्हणजे घाट परिसरात भौगोलिक परिस्थितीने वारंवार कोंडी निर्माण झाली. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. या महामार्गावर विकेंडच्या काळात वाहतूक कोंडीच्या मोठ्या प्रमाणात समस्या वाढू लागल्या आहेत.









