धार्मिक भावना! दर गुरुवारी मांस विक्री बंद, 5 हजारांच्या दंडाची तरतूद; महाराष्ट्रातील कोणत्या नगरपरिषदेने घेतला निर्णय?

मुंबई तक

Meat sale banned every Thursday : दर गुरुवारी मांस विक्री बंद ठेवायची. या निर्णयाचे उल्लंघन केल्यास 5 हजारांचा दंड आकारला जाणार...महाराष्ट्रातील कोणत्या नगरपरिषदेने घेतला निर्णय?

ADVERTISEMENT

Mutton NewsMutton News
Mutton News
google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी : दर गुरुवारी मांस विक्री बंद, नियम मोडल्यास 5 हजारांचा दंड

point

महाराष्ट्रातील कोणत्या नगरपरिषदेने घेतला निर्णय?

Meat sale banned every Thursday : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या धार्मिक नगरीत दर गुरुवारी चिकन-मटण विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अक्कलकोट नगरपरिषद प्रशासनाने हा निर्णय अंमलात आणताच शहरात त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. गुरुवारी बहुतांश मांस विक्रीची दुकाने बंद असल्याचे चित्र दिसून आले.

अक्कलकोट नगरपरिषदेने कशामुळे घेतला निर्णय? 

अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र स्थळामुळे ओळखले जाते. देशभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या धार्मिक वातावरणाला साजेसे वातावरण कायम राहावे आणि भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, या उद्देशानेच नगरपरिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : एक फ्लॅट, दोन पुरुष आणि फ्लॅटमध्ये मोलकरणीची रक्ताच्या थारोळ्यातील बॉडी, ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीत काय घडलं?

नियमांचे उल्लंघन केल्यास तब्बल पाच हजार रुपयांचा दंड

नगरपरिषदेकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, गुरुवारी मांस विक्री करताना आढळल्यास संबंधित दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन केल्यास तब्बल पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही या निर्णयाबाबत गांभीर्य दिसून येत आहे.

हे वाचलं का?