मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन अन् फर्निचर; अशोक खरातने व्यावसायिकाला किती लुटलं?

मुंबई तक

Ashok Kharat fraud case : भोंदू बाबा अशोक खरातच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 8 वा गुन्हा, अशोक खरातने मृत्यूची भीती दाखवून व्यावसायिकाला लुटले..मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन, फर्निचर बनवून घेतले

ADVERTISEMENT

Ashok Kharat fraud case
Ashok Kharat fraud case
google news

बातम्या हायलाइट

point

मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन अन् फर्निचर

point

अशोक खरातने व्यावसायिकाला किती लुटलं?

Ashok Kharat fraud case : नाशिकमधील महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे संपण्याचे नाव घेत नाहीयेत. अशोक खरात याच्याविरोधात आज (दि.26)  8 वा गुन्हा दाखल झालाय. व्यावसायिकाला मृत्यूची भीती दाखवत कोट्यावधी लुटल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल झाला आहे. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी  पुण्यातील व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

यापूर्वी वावी पोलीस ठाण्यात अशोक खरात यानेच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब विरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता. आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अशोक खरात विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजीस्टिक व तर ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय वाढवण्यासाठी "अवतार पूजा" करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा : चैत्र नवरात्रीची दुर्गा अष्टमी आज, 'या' शुभ मुहूर्तावर करा 'हे' काम.. होईल प्रचंड फायदा!

खरात याने व्यावसायिकाकडून अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कारची मागणी केली केली. मृत्यूची भीती असल्याने व्यावसायिकाने सन 2018 मध्ये MH 15 GL 8181 या क्रमांकाची मर्सडीज बाबाला भेट म्हणून दिली. अवतार पूजा करण्याआधी परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांत भ्रमण करत सिद्ध व्हावे लागेल, सिद्धी न झाल्यास केल्यास नागदेवता दंश करेल अशी अशोक खरातने मृत्यूची भीती दाखवली. अशाप्रकारे गुरूसेवा आणि मृत्यूची भीती घालत अमेरिकेत वैद्यकीय उपचाराचा खर्चही करण्यास भाग पाडले. अगदी कर्ज काढून अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी 29 लाख 81 हजार खर्च जासूद यांनी केला. 2018 पासून डिसेंबर 2025 पर्यत वेळोवेळी फसवणूक करून 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटले आहे, मुख्य म्हणजे अवतार पूजेसाठी पैसे उकळण्यासाठी भोंदू बाबाने 1 ऑक्टोबर 2018 ला रात्री 8 वाजेच्या सुमारास पूजेसाठी बोलावले. इशान्येश्वर मंदिराच्या मागील बाजूस अंधारात नेऊन ईशानेश्वर महादेव नागाच्या रुपात दर्शन देतील, असे भासवून खोटा नाग दाखवून भीती दाखवून फसवणूक केल्याचा दावा ही फिर्यादीत आहे. 

हे वाचलं का?