'यूरिनने स्वच्छ करा आपले डोळे', पुण्यातील महिलेने दिलेल्या टिप्सने लोकं संतापली!

मुंबई तक

27 Jun 2025 (अपडेटेड: 27 Jun 2025, 05:59 PM)

viral video : पुण्यातील एका तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत तिनं डोळे धुण्यासाठी युरिनच्या वापराबाबतची माहिती दिली आहे.

viral video

viral video

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोणी तुम्हाला युरिनने डोळे धुण्यास सांगितलेत?

point

एका तरुणीने सोशल मीडियावर युरिनने डोळे धुण्याचे टीप्स सांगितलेत

Viral Video : कोणी तुम्हाला युरिनने डोळे धुण्यास सांगितलेत? जर तुम्हाला असा प्रश्न कोणी विचारला तर तुम्ही काय कराल? जर कोणी असा प्रश्न केलाच तर त्याला तुम्ही मूर्खपणाचा कळसच म्हणाल. आता पुण्यातील एका तरुणीने सोशल मीडियावर मर्खपणाचा कळस केलाय. संबंधित तरुणीने लघवीने डोळे धुण्याचा व्हिडिओ शेअर करत हा सल्ला दिलाय. नुपूर पिट्टी असं त्या तरुणीचं नाव असून तिचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या व्हिडिओत नुपूरने युरिनने डोळे धुण्याचे फायदे सांगितलेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'पती मित्राला घेऊन आला घरी, दोघांचे अश्लील चाळे...', 'त्या' गोष्टीने महिला हादरली!

नुपूरच्या टीप्सने लोक आश्चर्यचकित 

नुपूरने दिलेल्या टीप्सनंतर सोशल मीडियावरील लोक आश्चर्यचकित आणि संतप्त झालेत. नुपूरने 26 जून रोजी व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओवर आता कमेंट्सचा वर्षाव होतोय. दरम्यान, हा व्हिडिओ एका इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून व्हायरल होत आहे. तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती नमूद केली.

नुपूरने तिच्या व्हिडिओत पहाटेच्या आधीच युरिनने डोळे धुण्याचे फायदे सांगितले आहेत. जर युरिनने डोळे धुतल्यास डोळ्याचा कोरडपणा आणि जळजळ कमी होते. त्यांनी कपमध्ये युरिन भरून त्यात डोळे बुडवून अनेक वेळा मिचकवा असं सांगितलं. नुपूरच्या मते, असे केल्यास चमत्कार होण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर तिनं सांगितलं की, हे करताना डोळे चारही बाजूला फिरवावेत. ज्यामुळे युरिन पूर्णपणे डोळ्यात जाऊन एका टॉवेलनं डोळे अगदी हळुवारपणे स्वच्छ करावेत, असा व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला देण्यात आला. 

हेही वाचा : राशीभविष्य: बुध ग्रहाची एंट्री होताच 'या' लोकांना मिळणार प्रमोशन, होणार मालामाल!

दरम्यान, संबंधित व्हिडिओ हा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक या उपायावर संताप व्यक्त करताना दिसतात. एका नेटकऱ्याने लिहिलं की, कृपया युरिन डोळ्याला लावू नका. कारण युरिनमध्ये जंतू असू शकतात आणि याचा विपरित परिणाम हा डोळ्यावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डोळे धुण्याचा कोणताही एक वैज्ञानिक पुरावा नाही. खरं तर युरिनमध्ये बॅक्टेरियाचा विपरित परिणाम हा डोळ्यांवर होईल.