Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मार्च महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 2 मार्च 2025 ला कोणतेही बदल झाले नाहीत. सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी 1 मार्चला सोन्याच्या दरात जवळपास 500 रुपयांची घट झाली होती. चांदीच्या दरात जवळपास 1100 रुपयांची घसरण झाली होती.
ADVERTISEMENT
भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर मागील तीन दिवसांच्या आत 1400 रुपयांनी कमी झाले. परंतु, आज रविवारी 2 मार्चला सोन्या-चांदीच्या किंमतीत खास बदल झाले नाहीत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 86800 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79500 रुपये झाली आहे.
दरम्यान, 1 मार्चला 24 कॅरेट सोन्याचे दर 500 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव 450 रुपयांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. तर चांदीच्या प्रति किलोग्रॅमच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. कालच्या प्रमाणे आजही चांदीचे प्रति किलोग्रॅमचे भाव 96900 रुपये आहेत. जर यामध्ये जीएसटी जोडलं तर याची प्रति किलोग्रॅमची किंमत 99910 रुपये होते. चांदीच्या जुन्या दागिन्यांचा एक्स्चेंज रेट जीएसटीशिवाय प्रति किलोग्रॅम 90000 रुपये असतं. 28 फेब्रुवारीला 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 98000 रुपयांवर पोहोचले होते. तर 27 फेब्रुवारीला चांदीचे प्रति किलोग्रॅमचे भाव 95725 रुपये झाले होते.
हे ही वाचा >> Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, सुरक्षारक्षकाला कॉलर धरून धक्काबुक्की, प्रकरण काय?
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत आज 86980 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79740 रुपयांवर पोहोचले आहेत.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत आज 86830 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79590 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> Drugs Smuggling : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेनं 100 कॅप्सूल गिळले, तपास अधिकारीही हादरले
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत आज 86830 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79590 रुपयांवर पोहोचले आहेत.
चेन्नई
चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत आज 86830 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79590 रुपयांवर पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
