Maharashtra Weather Today : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं धुमाकूळ घातला आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटाही पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल शुक्रवारी 9 मे रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सांगली, सोलापूर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. अशातच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजचं हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कसं आहे आजचं हवामान?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> पाकिस्तानने पुन्हा केला मोठा गोळीबार! उरी, पूंछसह या भागात केला हल्ला, PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय ठरलं?
तर मुंबई, परभणी, हिंगोली, अकोल्यात कोरडं हवामान असणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये 40-50 प्रतितास किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजी नगर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची अंदाजही हवामान विभागाकडून बांधण्यात आला होता.
हे ही वाचा >> 'तरुणांना पकडून सरळ थोबडवून काढायची', विंग कमांडर व्योमिकाचे 'ते' किस्से...
ADVERTISEMENT
