Maharashtra Weather : राज्यातील हवामान हे कोरडं राहिल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मुख्यत्वे 23 जानेवारी रोजी थंडावा कमी जाणवणार असल्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी सकाळी धुके तसेच काही प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. जाणून घेऊयात एकूण राज्यातील हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : विकृतीची परिसिमा! मुंबईतील मालाडमध्ये 20 वर्षीय तरुणाने 2 महिन्याच्या श्वानावर शौचालयात नेत केले अत्याचार
कोकण :
कोकणात मुंबईत कोरडं हवामान राहील. या विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या भागांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरण ढगाळ राहील असा हवामान विभागाचा अलर्ट आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापुरात मुख्यत्वे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात मोठी वाढ होणार असल्याने थंडावा कमी जाणवण्याची शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी स्थिर हवामान राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : लेकीकडे आलेल्या सासूला जावयाने दगडाने ठेचून ठार मारलं, लेकीनं सांगितला घटनेचा थरार
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा येथील भागात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके आणि दिवसभर उष्णता राहील असा अंदाज आहे.
ADVERTISEMENT











