नागपूरमधील OYO हॉटेलमध्ये प्रेमाचा भयानक अंत, प्रियकराने तरुणीवर चाकूने सपासप वार करत संपवलं

nagpur crime : नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याचं वृत्त आहे. तिच्या प्रियकराने चाकूने वार करत तिचा खून केला आणि नंतर तो घटनास्थळावळून पळून गेला. ही घटना 23 जानेवारी दुपारी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेत्री गावाजवळील ओयो हॉटेलमध्ये घडली. मृत महिलेचं नाव रुचिता भांगे असल्याचं सांगितलं जात आहे. प्रियकराने असं कृत्य का केलं असावं याबाबतची माहिती समोर आली आहे. 

nagpur crime

nagpur crime

योगेश पांडे

23 Jan 2026 (अपडेटेड: 23 Jan 2026, 09:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये तरुणाचा मृत्यू

point

प्रियकरावर गुन्हा दाखल

Nagpur Crime : नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याचं वृत्त आहे. तिच्या प्रियकराने चाकूने वार करत तिचा खून केला आणि नंतर तो घटनास्थळावळून पळून गेला. ही घटना 23 जानेवारी दुपारी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेत्री गावाजवळील ओयो हॉटेलमध्ये घडली. मृत महिलेचं नाव रुचिता भांगे असल्याचं सांगितलं जात आहे. प्रियकराने असं कृत्य का केलं असावं याबाबतची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : एकाच कुटुंबातील 4 जण जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात, भाजप नेत्याची घराणेशाही

प्रियकराने ओयो हॉटेलमध्ये प्रेयसीचा खून करत पळ काढला

प्रेमप्रकरणातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत घटनास्थळावरून पळ काढला. कमलेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओयो हॉटेलमध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून प्रियकराने तिच्या मानेवर चाकूने वार करत संपवलं. 

हे ही वाचा : मूल होत नसल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला संपवलं, हृदयविकाराचं कारण सांगत नातेवाईकांना...

प्रियकरावर गुन्हा दाखल

या हल्ल्यात तरुणी ही गंभीर जखमी झाली होती. काही वेळानंतर तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नंतर तपास सुरु केला. सध्या नागपूर ग्रामीण कमलेश्वर पोलिसांनी आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे, पण आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा शोध घेणं सुरु आहे. 

    follow whatsapp