एकाच कुटुंबातील 4 जण जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात, भाजप नेत्याची घराणेशाही
Parbhani Zp Election : नगरपालिका आणि महापालिका निवडणूक नुकत्याच पार पडल्या आहेत. याच निवडणुकीत घराणेशाहीची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. आमदार, खासदारांच्या मुलांना उमेदवारीचे तिकीट देण्यात आले होते. अशातच परभणीतील एका भाजपच्या नेत्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप नेत्याच्या कुटुंबातील पाच जण निवडणुकीच्या रिंगणात
वरपूडकर कुटुंबावर राजकीय घराणेशाहीचा आरोप
Parbhani Zp Election : नगरपालिका आणि महापालिका निवडणूक नुकत्याच पार पडल्या आहेत. याच निवडणुकीत घराणेशाहीची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. आमदार, खासदारांच्या मुलांना उमेदवारीचे तिकीट देण्यात आले होते. त्यातील काही जणांना मतदारांना स्विकारले तर काही जणांना मतदारांनीच घरचा आहेर दिला. त्यानंतर आता जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत देखील घराणेशाही बघायला मिळत आहे. परभणीतील एका भाजपच्या नेत्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे.
हे ही वाचा : मूल होत नसल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला संपवलं, हृदयविकाराचं कारण सांगत नातेवाईकांना...
भाजप नेत्याच्या कुटुंबातील 4 जण निवडणुकीच्या रिंगणात
काही आमदारांनी आपल्या मुलांना, पत्नीला, सुनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचं चित्र आहे. असाच प्रकार परभणीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील दोन-तीन नाहीतर तब्बल 4 जण हे निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याचं चित्र आहे. नेमकं कोणी कोणत्या पक्षाकडून उभं आहे याची माहिती आता समोर आली आहे.
चार जणांना उमेदवारी
सुरेश वरपूडकर हे भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांच्या घरातून पाच उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. वरपूडकर भाजपमध्ये येण्यापूर्वी काँग्रेस पक्षात होते. भाजपने घराणेशाही मोडीत काढू असं जाहीर केलं होतं. पण आता परभणीत भाजपकडून एकाच कुटुंबातील चार जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे ही वाचा : 10 वर्षाच्या मुलीला चहाचे आमिष दाखवून ई-रिक्षा चालकाकडून जंगलात अत्याचार, 'त्या' चप्पलवरून..
वरपूडकर कुटुंबावर राजकीय घराणेशाहीचा आरोप
ज्यात, मुलगा समशेर वरपूडकर पोखरणी जी. प. गटातून त्यांची सूनबाई प्रेरणा समशेर वरपुडकर, दैठणा जिप. पुतण्या अजित वरपूडकर लोहगाव जीप. गटातून, मुलगी सोनल वरपूडकर झरी जीप.गटातून (शिवसेना उबाटा गटा कडून ) लढणार आहे. तसेच पत्नीने नुकतीच महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून प्रभाग पाच मधून विजय मिळवला. यामुळे जिल्ह्यात वरपूडकर कुटुंबावर राजकीय घराणेशाहीचा आरोप लावला जात आहे.










