10 वर्षाच्या मुलीला चहाचे आमिष दाखवून ई-रिक्षा चालकाकडून जंगलात अत्याचार, 'त्या' चप्पलवरून...
Crime News : एका 10 वर्षाच्या मुलीला चहाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं वृत्त आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेनं दिल्ली हादरून गेली आहे. यामुळे आता दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा 12 तासांत छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीची ओळख पटली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
जंगलात नेऊन हैवानी कृत्य
Crime News : मध्य दिल्लीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 10 वर्षाच्या मुलीला चहाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं वृत्त आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेनं दिल्ली हादरून गेली आहे. यामुळे आता दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा 12 तासांत छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी नराधमाचं नाव दुर्गेश (वय 25) असे आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हे ही वाचा : फलटण हत्याकांड: पत्नीने पती आणि प्रियकरासोबत मिळून रचला कट अन् दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे नदी-तलावात...
10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
डीसीपी सेंट्रल यांच्या म्हणण्यांनुसार, पोलिसांनी 11 जानेवारी रोजी 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं. मुलीने पोलिसांना घडलेल्या घटनेची एकूण माहिती दिली. 10 जानेवारी रोजी बीएल कपूर रुग्णालयात एका अज्ञात रिक्षा चालकाने तिला चहा देऊन तिचं लैंगिक शोषण केलं.
जंगलाच्या एका निर्जन भागात नराधम्याचं हैवानी कृत्य
मुलगी संबंधित व्यक्तीसोबत जंगलाच्या एका निर्जन भागात गेली. त्याने एका निळ्या रंगाच्या खोली नेत तिच्यावर हल्ला केल्याचा पीडितेनं आरोप केला. दरम्यान, पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला असून मुलीने धाडस करून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तसेच नराधम्याच्या रिक्षाची ओळख देखील सांगितली होती.
मुलीची चप्पल आढळून आली
तक्रारीनुसार, प्रसाद नगर एसएचओच्या नेतृत्वाखाली पथकाने सुमारे 20 चौरस किमी परिसराचा शोध घेत 22 वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेणं सुरु ठेवलं. शोध घेताना पोलिसांनी रामनाथ विज मार्गावर मुलीची चप्पल आढळून आली होती. त्यावरून त्यांना गुन्ह्याचे ठिकाण शोधण्यास सोपं झालं. नंतर सीसीटीव्ही रेकॉर्ड बघून तपास केला. नंतर त्यातील ई-रिक्षा शोधली.










