‘बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या…’, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray facebook post on Balasaheb Thackeray Birth Anniversary : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक भावनिक पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच राजकारणात घेतलेली लवचिक भूमिका ही व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल असा शब्द त्यांनी या पोस्टमधून दिला आहे. जाणून घेऊया राज ठाकरे पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या…
राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray facebook post on Balasaheb Thackeray Birth Anniversary : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक भावनिक पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच राजकारणात घेतलेली लवचिक भूमिका ही व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल असा शब्द त्यांनी या पोस्टमधून दिला आहे. जाणून घेऊया राज ठाकरे पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?
हे ही वाचा : दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार: देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा.
आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं . सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा.