Maharashtra Weather : राज्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. यामुळे थंडीमध्ये कुठेतरी घट झाल्याचे दिसून येत आहे. हिवाळ्यात सध्या तापमानात काहीअंशी प्रमाणात बदल झाला. या बदलत्या हवामानामुळे गारवा सौम्य राहील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीला पोषक वातावरणाची निर्माण होण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'देशात हिंदू राजकीय शक्ती बनेल हे भाजपला माहिती नव्हतं', बाळासाहेबांमुळेच... राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा
कोकण :
कोकण विभागात राज्यातील बहुतांश ठिकाणी हवामान निरभ्र राहील अशी शक्यता वर्तवली. तसेच मुंबईत दिवसभर आकाश स्वच्छ राहील असा देखील अंदाज वर्तवला. हवामानाच्या अंदाजानुसार, सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णतेचा अनुभव येईल अशी शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरुपाचे राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि इतर परिसरात सकाळी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दुपारी किंवा सायंकाळी काही प्रमाणात वातावरण ढगाळ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सकाळी थोडा गारवा आणि तर दुपारी उष्ण वातावरण जाणवू शकते.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात हवामान स्वच्छ राहील असा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. याच विभागातील छत्रपती संभाजीनगरात दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कमी झाल्याने दिवसभरात उष्णतेत वाढ झाली आहे.
हे ही वाचा : एकाच कुटुंबातील 4 जण जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात, भाजप नेत्याची घराणेशाही
विदर्भ :
या विदर्भात काही प्रमाणात अंशत: ढगाळ वातावरण राहील. तसेच नागपुरातही ढगाळ वातावरणाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. सकाळी आणि रात्री काही प्रमाणात गारवा आणि उष्णतेत वाढ झालेली दिसून येईल.
ADVERTISEMENT











