'देशात हिंदू राजकीय शक्ती बनेल हे भाजपला माहिती नव्हतं', बाळासाहेबांमुळेच... राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबई तक

Raj Thackeray : शिवसेना दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्म शताब्दी आहे. या जन्मशताब्दी दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर भाष्य केलं. नंतर त्यांनी हिंदूंना जागृत करणारे हे बाळासाहेब ठाकरेच होते, हे भाजपला देखील माहिती नव्हते, असं म्हणत त्यांनी भाजपचे कान टोचले.

ADVERTISEMENT

Raj thackeray
Raj thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'बाळासाहेबांनीच हिंदूंना जागृक केलं'

point

या देशात हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे बाळासाहेबांनी सांगितलं

Raj Thackeray : शिवसेना दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी जन्म शताब्दी आहे. या जन्मशताब्दी दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. राज ठाकरे बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत रमले होते. बाळासाहेब या देशातील एकूण राजकारण्यांपैकी एक वेगळा माणूस होता, असं वक्तव्य केलं. नंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर देखील भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना जागृत कसं केलं त्याचा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. 

हे ही वाचा :  'देशात हिंदू राजकीय शक्ती बनेल हे भाजपला माहिती नव्हतं', बाळासाहेबांमुळेच... राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा

'राज्यात गुलामांचा बाजार सुरु'

आज देशात आणि राज्यात गुलामांचा बाजार सुरु आहे. बरं झालं आज बाळासाहेब नाहीयेत, कारण सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली असती तर ते व्यथित झाले असते. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष सोडण्याबाबत सांगितलं, मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्या या वेदना खूप वेगळ्या होत्या. मी जेव्हा बाहेर पडलो ते एका पक्षातून बाहेर पडलो नसून मी एका घरातून बाहेर पडलो. पण जे झालं ते झालं आता सोडून द्या, असं राज ठाकरे म्हणाले.  

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाषण करायचं

पुढे ते म्हणाले की, 'मला बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाषण करायचं आहे. बाळासाहेब हे खूप वेगळे होते, ते कधीच कोणाला एकसारखे दिसले नाही. आम्ही त्यांच्या घरातील आहोत आम्हाला देखील ते कळाले नाही ते तुम्हाला कधी कळेल', असं म्हणत त्यांनी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

या देशात हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे बाळासाहेबांनी सांगितलं

त्यानंतर त्यांनी प्रमोद महाजन आणि बाळासाहेब यांचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, 'तो किस्सा 1985 सालचा असेल. या देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावेन, तेव्हा प्रमोद महाजन म्हणाले होते की, हे शक्य नाही. त्यावर बाळासाहेब यांनी सांगितलं की तु मला अजून ओळखत नाहीस. त्यानंतर बाळासाहेब यांनी देशात हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते असं त्यांनी सांगितलं, पण याबाबत कोणालाही माहिती नव्हतं. भारतीय जनता पक्षाला देखील माहिती नव्हतं', असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपला कोपखळ्या मारल्या.  

हे वाचलं का?

    follow whatsapp