Personal Finance: आता काहीतरी मोठं होणार! India VIX देतंय धोक्याचे संकेत, नेमकं काय होणार?

शेअर मार्केटमधील चढउताराची भिती (इंडियन स्टॉक मार्केट), म्हणजेच इंडिया VIX, शुक्रवारी सुमारे 5 टक्क्यांनी वाढले. यामध्ये अचानक झालेल्या वाढीमध्ये पुढील 30 दिवसांतील मार्केटमधील अनिश्चितता आणि जोखीम दिसून येते.

आता काहीतरी मोठं होणार!India VIX देतंय धोक्याचे संकेत

आता काहीतरी मोठं होणार!India VIX देतंय धोक्याचे संकेत

मुंबई तक

09 May 2025 (अपडेटेड: 09 May 2025, 08:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

India VIX देतंय धोक्याचे संकेत

point

इंडिया VIX मध्ये दिसून आली अचानक वाढ

point

अचानक वर आला India VIX

Indo-Pak War Tension: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा तणाव आता सर्वत्र पाहायला मिळतोय. त्यात आता गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर तो तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. मात्र, हे प्रकरण आता इथेच थांबणार नसून काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शेअर मार्केटमधील चढउताराची भिती (इंडियन स्टॉक मार्केट), म्हणजेच इंडिया VIX, शुक्रवारी सुमारे 5 टक्क्यांनी वाढले. यामध्ये अचानक झालेल्या वाढीमध्ये पुढील 30 दिवसांतील मार्केटमधील अनिश्चितता आणि जोखीम दिसून येते.

हे वाचलं का?

अचानक वर आला India VIX

NSE च्या आकडेवारीकडे पाहता, शेअर मार्केटच्या भीतीचे प्रमाण दर्शवणारा  इंडिया VIX इंडेक्स 4.65 टक्क्यांनी वाढून 21.99 वर पोहोचला. हा निर्देशांक निफ्टी-50 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्सच्या आधारे अपेक्षित बाजारातील अस्थिरता म्हणजेच चढ-उतार मोजतो. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार अल्पावधीत (30 दिवस) जास्त अनिश्चितता किंवा जोखीम अनुभवत असल्याचं इंडिया VIX मधील वाढ दर्शवते .

शेअर मार्केटचं स्वरूप असं माहित पडतं

सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, बाजार किती अस्थिर (Volatile) असणार आहे हे भारतीय VIX निर्देशांक सांगते. याला (Volatile Index) असं देखील म्हणतात. ज्यावेळी हा निर्देशांक वाढतो तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये भिती दिसून येते. जर हा इंडेक्स 15 च्या आसपास असेल, तर मार्केटमधील क्रिया संतुलित असल्याचे मानले जाते. 15 पेक्षा कमी निर्देशांक मार्केटमध्ये येणाऱ्या वृद्धीचे संकेत देतो तर दुसरीकडे तो जितका वर जाईल तितकी मोठी घसरण होण्याची शक्यता असते.

हे ही वाचा: IPL 2025 Suspended: अजिबात नाराज व्हायचं नाही, IPL चाहत्यांसाठी आता BCCI कडून मोठी घोषणा!

शेअर मार्केटमध्ये कसा परिणाम दिसतो?

मार्केटमधील मोठी हालचाल दर्शवणारा इंडिया VIX इंडेक्स भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीच्या स्वरूपात दिसून आला. गुरुवारी, शेवटच्या व्यवहाराच्या काही तासात Sensex-Nifty अचानक घसरले. तर शुक्रवारी, आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी, दोन्ही इंडेक्स उघडताच कोसळलेले दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात, 30 शेअर्सचा समावेश असलेला BSE सेन्सेक्स 800 अंकांपेक्षा जास्त घसरून 78,968.34 च्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, NSE Nifty देखील 250 पेक्षा जास्त अंकांनी घसरून 23,935.75 वर आला. या दोन दिवसांच्या कालावधीत शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांचे जवळपास 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.


सध्या तरी दोन्ही देशांपैकी कोणीही युद्ध घोषित केलेले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या जास्त घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर सध्या नवीन गुंतवणूक करणं टाळा. पण पॅनिक सेलिंगसारखे पाऊल उचलू नका. यासोबतच बदलत्या परिस्थितीकडे लक्ष देत राहा. 

हे ही वाचा: What is S-400 Defence System: भारताचं हे आहे 'सुदर्शन चक्र', पाकला कळण्याआधीच खेळ होतो खल्लास.. खासियत तर विचारूच नका!

भारत-PAK मध्ये तणावाचं वातावरण

22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यामध्ये 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि सुमारे 100 दहशतवाद्यांना मारण्यात आले. पाकिस्तानने संतापून भारतावर हल्ला केला. गुरुवारी उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट येथे पाकिस्तानने केलेले हल्ले भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी हाणून पाडले. या काळात भारताने 50 हून अधिक ड्रोन नष्ट केले. तसेच पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 लढाऊ विमाने आणि एक AWACS विमान पाडण्यात आले.

    follow whatsapp