NABARD Recruitment 2025: सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उमेदवारांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. NABARD (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) म्हणजेच National Bank For Agriculture and Rural Development कडून ग्रेड A पदांवर भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 8 नोव्हेंबर सुरू होणार असून उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात ग्रेजुएशन/ पोस्ट ग्रेजुएशन/ एमबीए/ पीजीडीएम/ सीए/ सीएस/ आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच, भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारासाठी किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: 15 वर्षांच्या मुलीसोबत अल्पवयीन तरुणाचं घृणास्पद कृत्य! 7 महिन्यांची गर्भवती राहिली अन् धक्कादायक खुलासा...
या भरतीच्या माध्यमातून एकूण 91 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- असिस्टेंट मॅनेजर Grade 'A' (Rural Development Banking Service/RDBS): 85 पदे
- असिस्टेंट मॅनेजर Grade 'A' (Legal Service): 2 पदे
- असिस्टेंट मॅनेजर Grade 'A' (Protocol & Security Service): 4 पदे
अर्जाचं शुल्क
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूबीडी (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. तसेच, इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्जाचं शुल्क आकारण्यात येईल. उमेदवार ऑनलाइन माध्यमातूनच अर्जाचं शुल्क भरू शकतात.
हे ही वाचा: लग्नापूर्वीच पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध... नंतर, करोडो रुपयांच्या हुंड्याची मागणी करत लग्नाला नकार!
कसा कराल अर्ज?
1. 'नाबार्ड'च्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. त्यानंतर, होमपेजवरील Career Notices या लिंकवर क्लिक करा.
3. आता भरतीसंदर्भात लिंकवर जाऊन Apply Here वर क्लिक करा.
4. नंतर, Click here for New Registration वर क्लिक करून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
5. आता प्रवर्गानुसार, निश्चित शुल्क भरा.
6. शेवटी, भरलेला फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या आणि भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT











