15 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार, पीडिता 7 महिन्यांची गर्भवती राहिली अन्...
एका अल्पयीन मुलाने आपल्याच गावातील 15 वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. घटनेतील पीडित तरुणी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
15 वर्षांच्या मुलीसोबत अल्पवयीन तरुणाचं घृणास्पद कृत्य!
पीडिता 7 महिन्यांची गर्भवती राहिली अन्...
Crime News: हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अल्पयीन मुलाने आपल्याच गावातील 15 वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. अल्पवयीन आरोपी तरुणाने पीडितेला तिचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेतील पीडित तरुणी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
उल्ट्या सुरू झाल्याने डॉक्टरांकडे नेलं...
पोलिसांनी आरोपीला कोर्टात सादर केलं असून त्याला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. येथील महिला पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी याबद्दल तक्रार नोंदवली असून आपली मुलगी मागील दीड महिन्यापासून अस्वस्थ दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. अचानक, पीडितेला उल्ट्या सुरू झाल्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्यावेळी, औषधे देऊन सुद्धा तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.
सात महिन्यांची गर्भवती असल्याचं आढळलं
पीडितेची प्रकृती आणखी खालावत गेल्याने तिला डॉक्टरांकडे नेऊन तिचं अल्ट्रासाउंड करण्यात आलं. या दरम्यान, पीडितेसंदर्भात एक धक्कादायक बाब उघडकीस आली. 15 वर्षीय अल्पवयीन पीडिता ही जवळपास सात महिन्यांची गरोदर असल्याचं आढळून आलं. पीडितेने कुटुंबियांना तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं असता त्यांना मोठा धक्का बसला.
हे ही वाचा: लग्नापूर्वीच पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध... नंतर, करोडो रुपयांच्या हुंड्याची मागणी करत लग्नाला नकार!
प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
पीडितेने सांगितलं की, एक अल्पवयीन मुलगा तिच्यावर गेल्या सहा-सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता. त्या तरुणाने पीडितेला तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सुद्धा धमकी दिली होती. यावर पीडितेच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं की, "मी त्या तरुणाच्या घरी गेल्यानंतर त्याच्या या कृत्याबद्दल त्याला जाब विचारला. पण, याउलट त्याच्या कुटुंबियांनीच मला धमकी देण्यास सुरूवात केली आणि मुलीचा गर्भपात करण्यासाठी दबाव आणला."










