लग्नापूर्वीच पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध... नंतर, करोडो रुपयांच्या हुंड्याची मागणी करत लग्नाला नकार!
एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोसोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, मुलीच्या कुटुंबियांनी कोटी रुपयांच्या हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने तरुणाने लग्नासाठी नकार दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नापूर्वीच पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध...
करोडो रुपयांच्या हुंड्याची मागणी करत लग्नाला नकार!
Crime News: एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोला लग्नाच्या आधी भेटण्यासाठी बोलवलं आणि नंतर तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, मुलीच्या कुटुंबियांनी कोटी रुपयांच्या हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने तरुणाने लग्नासाठी नकार दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडल्याची माहिती आहे. याबाबत पीडित तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तक्रारीच्या आधारे आरोपी तरुणाविरुद्ध घृणास्पद कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
60 लाख रुपये हुंडा देण्याचं निश्चित...
पीडितेच्या म्हणण्यानुसार, साहिबाबाद येथील करहेडा कॉलनीमधील रहिवासी असलेल्या अंकुर चौहान नावाच्या तरुणासोबत तिचं लग्न ठरलं होतं. लग्न ठरवताना दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने मुलीच्या घरच्यांनी जवळपास 60 लाख रुपये हुंडा देण्याचं निश्चित करण्यात आलं. तसेच, तरुणीच्या वडिलांनी लग्नात नवऱ्याला देण्यासाठी एक महागडी कारसुद्धा बुक केली असल्याचं पीडितेने सांगितलं.
हे ही वाचा: "तुझी होणारी बायको तर रात्रीच..." लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ येताच नवऱ्याला आला फोन अन् कुटुंबियांना कळताच...
लग्नापूर्वी पीडितेसोबत घृणास्पद कृत्य...
24 ऑक्टोबर रोजी आरोपी तरुणाच्या कुटुंबियांनी पीडितेच्या वडिलांना फोन करून एका मॉलमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. दुपारी 2 वाजताच्या सुमारास, पीडिता तिच्या घरच्यांसोबत मॉलमध्ये पोहोचली. त्यावेळी, दोन्ही कुटुंबियांमध्ये बोलणं सुरू असताना आरोपी तरुणाने पीडितेसोबत लग्न करण्यास नकार दिला. तरुणाला याबद्दल जाब विचारला असता त्याने सांगितलं की, "मुलीचे कुटुंबीय लग्नासाठीच्या आमच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने मी या लग्नाला नकार देत आहे."
हे ही वाचा: लातूर: थेट ऑफिसमध्येच घुसून तरुणांवर कोयत्याने हल्ला! थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...
कोटी रुपयांच्या हुंड्याची मागणी
तसेच, या लग्नाला नकार देण्यापूर्वी आरोपीने पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा सुद्धा आरोपी तरुणीने केला. पीडितेनं सांगितलं की, 1 ऑक्टोबर रोजी आरोपी तरुणीला नोएडामधील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबतच लग्न करणार असल्याचं सांगून बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीच्या या कृत्याबद्दल त्याने त्याच्या कुटुंबियांना अजिबात कळू दिलं नाही. परंतु, त्यानंतर त्याने आमच्याकडून करोडो रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यास सुरूवात केली. आता पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी तरुणाविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.










