लातूर: थेट ऑफिसमध्येच घुसून तरुणांवर कोयत्याने हल्ला! थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...

मुंबई तक

लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे दोन आरोपी तरुणांनी एका खाजगी ऑफिसमध्ये घुसून तरुणांवर कोयत्याने हल्ला केल्याचं वृत्त समोर आली आहे.

ADVERTISEMENT

थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...
थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

थेट ऑफिसमध्येच घुसून तरुणांवर कोयत्याने हल्ला!

point

थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...

point

लातूरमधील धक्कादायक घटना

Latur Crime: लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे दोन आरोपी तरुणांनी एका खाजगी ऑफिसमध्ये घुसून तरुणांवर कोयत्याने हल्ला केल्याचं वृत्त समोर आली आहे. जुन्या वादातून ही भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

ऑफिसमध्ये घुसून कोयत्याने हल्ला...

संबंधित घटना ही लातून शहरातील मलवटी रोडवरील पिंटू हॉटेलजवळ असलेल्या एका प्रायव्हेट ऑफिसमध्ये घडली. 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी जवळपास 7 वाजताच्या सुमारास क्षीरसागर येथे आपल्या ऑफिसमध्ये बसलेल्या तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अजय खिच्ची, विकास कतारी आणि त्याच्या एका मित्रावर अचानक ऑफिसमध्ये घुसून कुणाल मोहिते आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अज्ञात तरुणाने कोयत्याने हल्ला केला. आरोपींनी पीडित तरुणांच्या डोकं, हात आणि पाठीवर निर्दयीपणे हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: मुंबईहून सुट्टी एन्जॉय करायला गेले मालवणला, एकाच वेळी खाणीत बुडाले 5 जण

परिसरात दहशतीचं वातावरण 

या भयानक हल्ल्यात अजय खिच्ची आणि विकास कतारी गंभीररित्या जखमी झाल्याकारणाने त्या दोघांना लातूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पीडित तरुणांवर हल्ला केल्यानंतर आरोपी त्यांच्या हातात असलेला कोयता घेऊन पळून गेले. या घटनेने ऑफिसजवळील परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

हे ही वाचा: रायगड हादरलं, सख्खा भावांनी मिळून केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून, धक्कादायक कारण समोर

आरोपींविरुद्ध FIR दाखल 

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच, घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या विकास कतारी या पीडित तरुणाने आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी कुणाल विनोद मोहिते आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध BNS च्या कलम 109, 118(1), 3(5) अंतर्गत विवेकानंदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली आहे. या प्रकरणासंदर्भात आता पोलीस अधिकचा तपास करत असल्याची माहिती आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp