"तुझी होणारी बायको तर रात्रीच..." लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ येताच नवऱ्याला आला फोन अन् कुटुंबियांना कळताच...
वर लग्नाची वरात घेऊन आपल्या लग्नासाठी निघणार इतक्यात त्याला अचानक एक फोन आला. या फोनमध्ये तरुणाला त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल अशी काही माहिती मिळाली की, त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ येताच नवऱ्याला आला फोन...
"तुझी होणारी बायको तर रात्रीच..." फोनवरून धक्कादायक बातमी
नेमकं काय घडलं?
Crime News: एक तरुण त्याच्या लग्नाच्या दिवशी अगदी उत्साहात तयारी करत होता. पण, तो त्याची लग्नाची वरात घेऊन आपल्या लग्नासाठी निघणार इतक्यात त्याला अचानक एक फोन आला. या फोनमध्ये तरुणाला त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल अशी काही माहिती मिळाली की, त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. खरं तर, आपल्या लग्नाच्या आदल्या रात्री तरुणी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. हे प्रकरण उत्तराखंडच्या उधमसिंह नगर येथील असल्याची माहिती आहे.
नवऱ्याला मोठा धक्का बसला
लग्नाच्या आदल्या रात्रीच मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याबद्दल वराच्या कुटुंबियांना काहीच माहिती देण्यात आली नव्हती. नवरा त्याच्या लग्नाच्या दिवशी खूप उत्साहात होता. पण, आपल्या लग्नाची वरात घेऊन वर निघणार इतक्यातच त्याला फोनवरून आपली होणारी बायको रात्रीच तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली. यामुळे, तरुणाला मोठा धक्का बसला.
हे ही वाचा: लातूर: थेट ऑफिसमध्येच घुसून तरुणांवर कोयत्याने हल्ला! थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...
लग्नाच्या आदल्या रात्री प्रियकरासोबत गेली पळून...
संबंधित तरुण हा बाजपुर नगरपालिका परिसरातील एका वॉर्डमधील रहिवासी होता. उत्तर प्रदेशातील एका गावात राहणाऱ्या तरुणीसोबत त्याचं लग्न ठरलं होतं. रविवारी (2 नोव्हेंबर) त्या दोघांचं लग्न होणार होतं. लग्नासाठी सर्व तयारी सुद्धा करण्यात आली होती. मात्र, लग्नाच्या दिवशीच मुलीच्या कुटुंबियातील एका व्यक्तीचा वराला फोन आला आणि नवरी तिच्या प्रियकरासोबत रात्रीच पळून गेल्याचं त्या फोनवरून सांगण्यात आलं.
हे ही वाचा: हातावर मेहंदी लावून आल्याने वर्गात बसू देण्यास नकार, मुंबईतील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस, मनसे आक्रमक
पोलिसांनी दिली माहिती
ही माहिती मिळताच वराच्या कुटुंबियांमध्ये गदारोळ माजला. याबाबत संतापलेल्या वराच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली. दोघांच्या लग्नाच्या तयारीसाठी मोठा खर्च झाला असून आता मुलाच्या कुटुंबियांना सामाजिक अपमानाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली. तसेच, हे प्रकरण कौटुंबिक वादाचं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या, तरुणी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.










