हातावर मेहंदी लावून आल्याने वर्गात बसू देण्यास नकार, मुंबईतील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस, मनसे आक्रमक

मुंबई तक

Mumbai school refused to sit in class because of mehndi on hands of student : हातावर मेहंदी लावून आल्याने वर्गात बसू देण्यास नकार, मुंबईतील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस, मनसे आक्रमक

ADVERTISEMENT

Mumbai school refused to sit in class because of mehndi on hands of student
Mumbai school refused to sit in class because of mehndi on hands of student
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हातावर मेहंदी लावून आल्याने वर्गात बसू देण्यास नकार

point

मुंबईतील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस, मनसे आक्रमक

Mumbai school refused to sit in class because of mehndi on hands of student : चेंबूरमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमध्ये हातावर मेहंदी लावल्यामुळे काही विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारल्याच्या तक्रारीमुळे पालक आणि शिक्षण विभागात चांगलाच गदारोळ माजला आहे. या प्रकरणाची दखल घेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळेला भेट देऊन चौकशी केली. तसेच शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी शाळेला लेखी खुलासा मागवणारी नोटीस बजावल्याचे समोर आले आहे.

पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी सुमारे 15 ते 20 विद्यार्थिनींना हातावर मेहंदी असल्याच्या कारणावरून वर्गाबाहेर उभे करण्यात आले. याविषयी पालकांनी मनसेच्या चेंबूरमधील नेत्यांकडे याबाबतची तक्रार सांगितली . त्यानंतर मनसेचे सरचिटणीस कर्ण दुनबळे यांनी स्वतः शाळेत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काही पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुलींना मेहंदी काढेपर्यंत वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र मनसेच्या हस्तक्षेपानंतर त्यांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात आली.

हेही वाचा : 'मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल पण...', शिंदेंच्या मराठी आमदारने उडवली खळबळ

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसे सरचिटणीस कर्ण दुनबळे म्हणाले, “शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक ओळखीवरून भेदभाव करण्याचा अधिकार कोणालाही नाही. राज्यघटनेने प्रत्येकाला शिक्षणाचा समान अधिकार दिला आहे. आमच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थिनींना वर्गात बसवण्यात आले. मात्र पुढील काळात असाच प्रकार घडल्यास मनसेच्या स्टाईल आंदोलन केले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp