Ind vs Pakistan : पाकिस्तान पहाटे ३ वाजेपासून काय-काय करत होतं? भारतात कोणकोणत्या ठिकाणी केला हल्ला?

India vs Pakistan War Latest Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs Pakistan

मुंबई तक

10 May 2025 (अपडेटेड: 10 May 2025, 10:01 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाकिस्तानने पहाटे 3 वाजल्यापासून भारतावर केला हल्ला

point

भारतानेही एअर मिसाईल सिस्टम केली सुरु

point

पाकिस्तानने भारताच्या कोणत्या भागात केला हल्ला?

India vs Pakistan War Latest Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. काल शुक्रवारी रात्री उरी, जम्मू, पठाणकोट, पूंछमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. परंतु, भारताने पाकिस्तानला जशाच तसं उत्तर देत त्यांचे ड्रोन हाणून पाडले. दरम्यान, आज शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासून पाकिस्तानने भारताच्या 17 ठिकाणी हल्ले केले आहेत. 

हे वाचलं का?

पाकिस्तानने आज पहाटे 3 वाजल्यापासून काय-काय केलं?

  • पठाणकोट - ड्रोन दिसले
  • राजौरी - मोठा गोळीबार, सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू, दोन सरकारी कर्मचारी गंभीर जखमी
  • श्रीनगर - पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने एअर मिसाईल सिस्टम सुरु केली.
  • जैसलमेर (पोकरण) - प्रक्षेपणास्त्र सापडलं
  • बडमेर - प्रक्षेपणास्त्र सापडलं आणि ड्रोन हल्ला
  • जलंधर - प्रक्षेपणास्त्र सापडलं
  • फिरोजपूर - फिरोजपूरच्या नागरि वस्तीत ड्रोन हल्ला, काही नागरिक जखमी
  • अमृतसर - ड्रोन हल्ला

हे ही वाचा >> मोठी बातमी! पाकिस्तानची आता खैर नाही...भारताने एअर मिसाईल सिस्टम केलं सुरु, नेमका प्लॅन काय?

  • तारानगर, चुरू राजस्थान - प्रक्षेपणास्त्र सापडलं
  • सिरसा (फतेह मिसाईल डिफ्यूज) - प्रक्षेपणास्त्र सापडलं
  • बारामुल्ला - गोळीबार
  • कुपवाडा - गोळीबार
  • नौशेरा - गोळीबार
  • कछ, गुजरात - प्रक्षेपणास्त्र सापडलं
  • बिकानेर - प्रक्षेपणास्त्र सापडलं
  • पूंछ - प्रक्षेपणास्त्र सापडलं 

हे ही वाचा >> Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने सुरु केलं 'बुनयान उल मरसूस', नेमका अर्थ काय?

भारताने पाकिस्तानच्या नूर खान (रावलपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफिकी (शोरकोट) एअरबेसवर जोरदार हल्ला केला. या ठिकाणी पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या सैनिकांवर केलेला हल्ल्याने त्यांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान, पाकिस्तानने त्यांचे विमानतळ बंद केले आहेत. तणावामुळे पाकिस्तानने त्यांचे एअरबेस आज सकाळी 12 पर्यंत पूर्णपणे बंद केले आहेत. तसच भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि अन्य शहरांमध्येही मोठा हल्ला केला आहे.

    follow whatsapp