Matheran Incidence : पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीचा पूल कोसळल्याची घटना ताजी आहे. अशातच आता कर्जतच्या माथेरानमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या शॉर्लेट तलावात 3 पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान हे तीन पर्यटक नवी मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना (15 जून) रोजी घडल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : कुंडमळ्यात मोठी दुर्घटना! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला..6 जणांचा मृत्यू, तर अनेक पर्यटक...
इको पॉईंट, मंकी पॉईंटप्रमाणे इतर अनेक वीकेंड स्पॉट आहेच. अशा ठिकाणी पर्यटक शनिवारी आणि रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात येत असतात. यापैकी प्रसिद्ध असलेल्या शॉर्लेट तलाव हा पॉईंट आहे. अनेक पर्यटक तलावाजवळ जातात आनंदुल लुटतात. सेल्फी काढतात तसेच पोहण्याचा आनंद लुटतात. अशातच या शॉर्लोट तलावात पोहताना तीन पर्यटकांना मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणाकी घटना घडली आहे. हे पर्यटक नवी मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे.
तिघांचा बुडून मृत्यू
सुमित चव्हाण वय वर्षे 16, आर्यन खोब्रागडे वय वर्षे 19, तसेच फिरोज शेख वय वर्षे 19 अशी बुडालेल्यांची नावे आहेत. एकूण 10 जण हे पाण्यात पोहण्यासाठी उतरली होती. त्यापैकी तिघांना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : वहिनीशी वाद झाला अन् नणंदेनं उचललं टोकाचं पाऊल; जाऊन बसली विजेच्या खांबावर, गावानं पाहिला तमाशा
अशातच सह्याद्री रेस्कू पथक आणि पोलिसांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक तलावात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पावसाळ्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
माथेरानमध्ये पावसाळ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होताना दिसते. दस्तुरीपासून ते चांगभलं मंदिापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात, यामुळे पर्यटकांचा जीव मेटाकुटीला येतो.
ADVERTISEMENT
