वहिनीशी वाद झाला अन् नणंदेनं उचललं टोकाचं पाऊल; जाऊन बसली विजेच्या खांबावर, गावानं पाहिला तमाशा

मुंबई तक

Viral Video : बिहारमधील मायापुर गावात एका 22 वर्षीय सोनी देवी नावाच्या तरुणीचा आपल्याच वहिणीसोबत वाद झाला. रागाच्याभरात सोनी देवी ही विजेच्या खांबावर चढल्याची धक्कादायक घटना घडली. विजेच्या खांबाला 11 हदार वॉल्टचा करंट होता, अशी माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

viral video
viral video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

22 वर्षीय सोनी देवी नावाच्या तरुणीचा प्रताप

point

11 हजार वॉल्टचा करंट असणाऱ्या विजेच्या खांबाला तरुणी लटकली

Viral Video : बिहारमधील मायापुर गावात एका 22 वर्षीय सोनी देवी नावाच्या तरुणीचा आपल्याच वहिणीसोबत वाद झाला. रागाच्याभरात सोनी देवी ही विजेच्या खांबावर चढल्याची धक्कादायक घटना घडली. विजेच्या खांबाला 11 हदार वॉल्टचा करंट होता, अशी माहिती समोर आली आहे. वादाच्या क्षुल्लक कारणावरून सोनी देवी यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, तब्बल 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती

अशावेळी ग्रामस्थांनी सोनीला खाली उतरण्याची विनंती केली. विजेच्या खांबांना करंट असल्याने सोनीचा जीव धोक्यात येईल, अशी ग्रामस्थांना चिंता सतावत होती. 11 हजार वॉल्टच्या तारांना सोनी चुकूनही चिटकली जावू नये, असे ग्रामस्थांना वाटत होते. सोनीला विजेच्या खांबावर चढलेलं पाहून ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तिला खाली उतरण्याची विनंती केली असता, तिनं ऐकलं नाही.  

सोनी देवी अर्धा तास विजेच्या खांबावर

सोनी देवी ही अर्धा तास विजेच्या खांबावर लटकली होती. यामुळे एकच गोंधळ उडून गेला होता. अशावेळी ग्रामस्थांनी स्थानिक विज विभागाला तातडीने संपर्क करत विज पुरवठा खंडीत करण्याची विनंती केली. यानंतरही सोनी विजेच्या खांबावरून खाली उतरायचं नाव घेईना. अशावेळी ग्रामस्थांनी तिला समजून सांगितले आणि खाली उतरण्याची विनंती केली. यानंतर ती विजेच्या खांबावरून उतरण्याचा निर्णय घेतला. 

अशावेळी सोनी देवी ही बेशुद्ध पडली होती. तिला तात्काळ फतेहपुरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सोनी देवीची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

हेही वाचा : कायदा अन् सुव्यवस्थेचा धाक उरला नाही, महिला पोलीस अधिकाऱ्यावर गुंडांकडून गोळीबार

संबंधित घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कौटुंबिक कलहामुळे सोनी देवीनं उचललेलं पाऊल अगदी गंभीर आहे. ग्रामस्थांच्या सततच्या विनंतीने मोठी दुर्घटना टळली आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp