Wife Killed Husband, Shocking Love Story Viral : उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये 50 वर्षीय एका महिलेनं प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे करून सिकंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांना मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे सापडले. पण अजूनही मुंडकं सापडलं नाहीय. पोलिसांकडून हत्या झोलेल्या व्यक्तीचं मुंडकं शोधण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, या हत्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणात मृताची पत्नी माया देवी, तिचा प्रेमी अनिल यादव आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश आहे. पोलिसांच्या चकमकी दरम्यान एका आरोपीच्या पायाला गोळी लागली.
ADVERTISEMENT
पोलिसांनी 4 आरोपींना केली अटक
बलिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी सिकंदरपूर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या गावात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विहिरात मृतदेहाचे अन्य काही तुकडे पोलिसांना सापडले. राजेंद्र कुमार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर मृताची पत्नी माया देवी आणि तिचा प्रियकर अनिल यादव यांच्यावर संशयाची सुई फिरली.
हे ही वाचा >> बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीचा आणखी एक Video आला समोर, दुसऱ्या तरुणासमोरही...
कारण या तिघांमध्ये खूप जवळीक होती. सुरुवातीला या आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पण कॉल डिटेल्स आणि अन्य साक्षीदारांच्या आधारावर त्यांचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी खाकीचा दणका दिल्यावर दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर या हत्याप्रकरणात सामील असलेल्या अन्य आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी आरोपी सतीश यादव आणि मिथिलेशच्याही मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी असा केला घटनेचा पर्दाफाश
घटनेचा खुलासा करत एसपी ओमवीर सिंह म्हणाले, माया देवीने पोलिसांना जबाब दिला की, तिचा पती राजेंद्र कुमार जे बीआरओ विंगमधून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ येत आहे. ते मुलीला आणण्यासाठी बिहारच्या बक्सर रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यानंतर पोलसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. याचदरम्यान खरीद गावात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.
हे ही वाचा >> 70 वर्षीय भाजप नेत्याचा डान्सरसोबत अश्लील Video झाला Viral
पण पोलिसांना मृत राजेंद्र कुमार यांचं मुंडकं सापडलं नाही. त्यानंतर पोलिसांनी माय देवीकडे कसून चौकशी केली. माया देवी आणि तिचा प्रियकर यांच्यावर संशय वाढल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आरोपींनी सांगितलं की, राजेंद्रचं डोकं घागरा नदीत फेकून दिलं. आता पोलीस गोताखोरांच्या मदतीने मुंडकं शोधण्याचं काम करत आहेत.
ADVERTISEMENT
