75 वर्षाच्या वृद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत विवाह उरकला, पण मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूने गाठलं; नेमकं काय घडलं?

75 वर्षाच्या वृद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत विवाह उरकला, पण मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूने गाठलं; नेमकं काय घडलं?

Mumbai Tak

मुंबई तक

01 Oct 2025 (अपडेटेड: 01 Oct 2025, 02:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

75 वर्षाच्या वृद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत विवाह उरकला

point

पण मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूने गाठलं

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका 75 वर्षीय वृद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत लगीनगाठ बांधली. मात्र, मधुचंद्राच्या दुसऱ्याच दिवशी या वृद्धाचा मृत्यू झालाय. या वृद्धाने एक दिवस आधीच तीन मुलांची आई असलेल्या महिलेशी विवाह केला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : भाजप सोडून कोणात्याही पक्षाशी युती करा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकांसाठी प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय

मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्धाचा मृत्यू 

मिळालेल्या माहितीनुसार, गौराबाद शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुछमुछ गावातील एका वृद्धाने सोमवारी तीन मुलांची आई असलेल्या महिलेशी लग्न केले. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी पहाटे त्यांची तब्येत अचानक बिघडली. शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सगरू राम (वय 75) यांनी जवळपास 40 वर्षांपूर्वी बेलाव गावातील अनारी देवी यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला एकही अपत्य  नव्हतं. वर्षभरापूर्वी आजारपणामुळे अनारी देवी यांचे निधन झाले. त्यानंतर सगरू राम एकटेच राहत होते.

ग्रामस्थांच्या मते, सगरू राम यांच्या नावावर सुमारे दोन 1.25 एकर जमीन व एक घर होते. दुसरीकडे, मनभावती (वय 35) हिच्या पतीचा सात वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला होता. तिला तीन मुलं देखील आहेत. दरम्यान सगरू राम आणि मनभावती एकमेकांच्या संपर्कात आले. नातं पुढे सरकल्यावर दोघांनी सोमवारी मंदिरात हिंदू पद्धतीनुसार विवाह केला. पत्नीच्या म्हणण्यानुसार, ती रात्री मुलीला घेऊन आत झोपायला गेली होती, तर सगरू राम दोन मुलांसह बाहेर झोपले होते.

हेही वाचा : कुणबी दाखले दिलेल्यांची संख्या मोजा, वेगळा प्रवर्ग करा; गोपीचंद पडळकर काय काय म्हणाले?

पहाटे त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या मानेला वाकडेपणा आला होता. हे पाहून शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. सगरू राम यांचे पुतणे नोकरीसाठी दिल्लीमध्ये राहतात. या घटनेबाबत माहिती असल्याचे अधिकारी प्रवीण यादव यांनी सांगितले असून तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

वृद्ध व तीन मुलांची आई असलेल्या महिलेच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दोघे मंदिरात विवाह करताना दिसत आहेत. अक्षता पडल्यानंतर ते स्वतःच आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर पत्नीच्या कपाळावर सिंदूर लावतात. मात्र, व्हिडिओ शूट करणारे काही जण म्हणतात की, "बरोबर भरले गेले नाही," त्यानंतर व्यवस्थित सिंदूर भरण्याच प्रयत्न करतात. विवाह विधी संपल्यावर पत्नी त्यांचे आशीर्वाद घेते आणि ते देखील तिला आशीर्वाद देताना दिसतात. 

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारची आणखी एक मोठी अट, सविस्तर माहिती एका क्लिकवर

    follow whatsapp