अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदाच्या वर्षात 100 वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, अमरावतीतील संघाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई उपस्थित राहणार असल्याची पत्रिका व्हायरल होत होती. त्यामुळे भूषण गवई (Bhushan Gavai) यांच्या आई कमलाताई गवई या संघाच्या कार्यक्रमाला खरच उपस्थित राहणार आहेत का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर याबाबत भूषण गवई यांचे भाऊ राजेंद्र गवई (Rajendra Gavai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
राजेंद्र गवई काय काय म्हणाले?
राजेंद्र गवई म्हणाले, पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीला होत आहे. त्याचं निमंत्रण आईसाहेबांना भेटलेलं आहे. आईसाहेबांनी ते निमंत्रण त्यांनी स्वीकारलं आहे. विजयादशमीच्या कार्यक्रमानंतर हा कार्यक्रम आहे. संघाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये यापूर्वी नागपूरमध्ये आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहे. इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते.विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे संबंध होते. संबंध भावा भावांचे होते, परंतु विचारधारा ही वेगवेगळी होती. कार्यक्रमाला गेलं म्हणजे विचारधारा बदलेलं असं मुळीच नाही. एकमेकांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे, अशा मताचा मी आहे.
आईसाहेबांनी निर्णय घेतलेला नाही, त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी पाठिशी राहाणार
गवई साहेबांच्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे. काही सकारात्मक कमेंट्स देखील आहेत.त्यामुळे उलट्या सुलट्या पोस्ट सोशल मीडियावर टीका केल्या जातात. भूषणजी गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे मुद्दामून विरोधक पद्धतीने टीका टिपणी करत आहेत. काही सकारात्मक देखील टिपणी होत आहे, पण मी त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. मी आईसाहेबांनी सांगेन, आईसाहेबांनी निर्णय घेतलेला नाही. पण मी त्यांना सांगेल तुम्ही कोणताही निर्णय घ्या, एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही सर्वधर्मसमभावाला मानणारे आहोत. सर्वधर्मसमभावाच्या पक्षासोबत काल होतो, आजही आणि आणि उद्याही राहिले.
Former CJI D Y Chandrachud | शिवसेना पक्ष फूट, महाराष्ट्रातील सत्तांतर, विधानसभा अध्यक्षांची भूमिका
ADVERTISEMENT
