Beed Crime News : बीडच्या पंचायत समिती कार्यालयात सरपंच आणि बाजार समितीचे संचालक यांच्यात तुफान राडा झाला. माझ्या गावातील लोकांची कामं तु का करतोस , असं म्हणत सरपंचानं बाजार समिती संचालकावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोराचं नाव संदिप डावखर असून बीड तालुक्यातील मौजगावचे ते सरपंच आहेत. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांच्यावर डावखर यांनी अचानक हल्ला केला. यानंतर अश्लील शिवीगाळ करत दगडाने देखील मारहाण केली. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसात संदिप डावखर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तरुणीनं प्रेमाला नकार देऊन मोबाईल नंबर ब्लॉक केला, तरुणाने घरात घुसून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं
माझ्या गावची कामं तू का करतोस...?
माध्यमांशी बोलताना बीड पंचायत समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी हल्ल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, 'पंचायत समिती बीड याठिकाणी घरकुल आणि विहिरींच्या रखडलेल्या मागण्यासंदर्भात अनेक लोक आले होते. याठिकाणी मौजगाव इथून एक व्यक्ती आला होता. त्याची अडचण घेऊन तो व्यक्ती माझ्याकडे आला. मात्र माझ्या गावची कामं तु का करतोस असं म्हणत मौजगावच्या सरपंचांनी माझ्यासोबत हाणामारी केली. यानंतर दगडाने मारण्याचा प्रयत्नही केला.'
हे ही वाचा : शक्तीवर्धक गोळ्या घेऊन बनायचा हैवान, अत्याचाराला कंटाळलेल्या पत्नीने पतीला दुधात विष घालून संपवलं
मारहाणीमागे काही राजकीय वैर आहे का?
मारहाणीमागं काही राजकीय कारण आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात ज्यापद्धतीने मी लोकांमध्ये जातो, ते त्यांना आवडत नसल्याने माझ्यावर हल्ला केला असावा. मारहाणीची तक्रार मी पोलिसांना दिली आहे. मला मारहाण करत असतानाचे व्हिडीओ देखील आहेत. पंचायत समितीच्या कॅमेऱ्यातही ही घटना कैद झाली आहे.
ADVERTISEMENT











