Maharashtra Weather : राज्यात काही प्रमाणात तापमानात बदल झाल्याची शक्यता आहे. तसेच अवकाळी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊयात 28 जानेवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जिलेबीसाठी दुकानदाराने पैशांची मागणी करताच ग्राहक शिक्षक संतापला, मालकाला उकळत्या तेलात ढकललं
कोकण :
कोकण विभागात वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी पहाटे धुक्याची झालर जाणवेल. तापमानात काही प्रमाणात बदल जाणवण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तसेच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची श शक्यता आहे. सकाळी धुक्याची शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट शक्य आहे. ढगाळ वातावरण राहील, असा हवामान विभागाने अलर्ट जारी केला.
हे ही वाचा : बीड : माझ्या गावची कामं तू का करतोस..? सरपंचाकडून बाजार समितीच्या संचालकावर हल्ला, व्हिडीओ व्हायरल
विदर्भ :
विदर्भात ढगाळ वातावरण राहील, तसेच काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या धारा कोसळतील. सकाळी धुक्यांची झालर पसरणार आहे. एकूणच, राज्यात थंडीचा कडाका कमी होत असताना अवकाळी पावसाचं सावट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT











