Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. तर तापमानात काही प्रमाणात वाढ होईल, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे मराठवाड्यात काहीअंशी प्रमाणात पावसाचा अंदाज असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जाणून घेऊयात 27 जानेवारी रोजी राज्यातील एकूण हवामान परिस्थितीचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरांनी महिला पेशंटला भुलीचं इंजेक्शन दिलं, नंतर अश्लील रिल बनवून केलं ब्लॅकमेल
कोकण :
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई-ठाणे परिसरात धुके राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची राहील, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता अधिक असून समुद्रकिनारी मध्यम ते वेगाने वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापुरातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहण्याची शक्यता आहे. सकाळी काही प्रमाणात थंडावा जाणवेल, तर दुपारी उष्णता वाढेल.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचे अधिक प्रमाण राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या म्हणेजच 27-28 जानेवारी रोजी मोजक्याच ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच सकाळी धुक्याची झालर राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : किशोरवयीन मुलीला खोलीत नेत केले सामूहिक अत्याचार, डोळ्यावर इतकं मारलं की काहीही दिसेना
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











