Padmashri Award : भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश असून त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : खासदार संजय राऊतांना कर्करोग झाल्याचं कधी समजलं? कोणता कॅन्सर झाला? स्वत: सांगितलं
महाराष्ट्रातील या चौघांना मिळणार पद्मश्री :
1) रघुवीर खेडकर (पद्मश्री)
2) भिकल्या लडक्या धिंडा (पद्मश्री)
3) श्रिरंग देवबा लाड (पद्मश्री)
4) आर्मिदा फर्नांडीस (पद्मश्री)
रघुवीर खेडकर : खेडकर हे एक लोकनाट्य कलाकार आहेत. या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
भिकल्या लडक्या धिंडा : 89 वर्षीय धिंडा यांची असामान्य तारपावादक म्हणून ओळख आहे. ते पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या वाळवंडे गावचे आहेत. आपल्या वडिलांकडूनच त्यांना तारपावादन आणि तारपा निर्मीतीचा वारसा मिळाला. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
श्रीरंग देवबा लाड : लाड हे परभणी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. कापसाच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी संशोधन केले आहे. त्यांच्या या कार्यासाठीच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.
आर्मिदा फर्नांडीस : डॉ. आर्मिदा फर्नांडिस या मुंबईतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि स्नेहा या संस्थेच्या संस्थापिका आहेत. आशियातील पहिली मानवी दुग्धपेढी स्थापन करणे, नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करणे आणि झोपडपट्टीतील माता-बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. यासाठी पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : मुंबई : लोकल ट्रेनमध्ये वादावादी अन् प्राध्यापकाची हत्या, मालाडमधील घटनेचं CCTV फुटेज समोर VIDEO
2026 पद्म पुरस्कार विजेते :
अंके गौडा
भगवान दास रायकवार
ब्रिजलाल भट्ट
बुधरी ताती
चरण हेम्ब्रम
चिरंजीलाल यादव
धार्मिक लाल चुन्नी लाल पांड्या
गफरुद्दीन मेवाती जोगी
हेली वार
इंद्रजीतसिंग सिद्धू
के. पाजनिवेल
कैलाशचंद्र पंत
खेमराज सुंद्रियाल
कोल्लक्कायील देवकी अम्मा
कुमारस्वामी थंगराज
महेंद्रकुमार मिश्रा
मीर हाजीभाई कासंभाई
मोहन नगर
नरेश चंद्र देव वर्मा
निलेश विनोदचंद्र मंडलेवाला
नुरुद्दीन अहमद
ओथुवार तिरुथानी स्वामीनाथन
पद्मा गुरमेट
पोखिला लेकथेपी
पुन्नियामूर्ती नटेसन
आर. कृष्णन
रघुपत सिंग
रघुवीर तुकाराम खेडकर
राजस्थापती कालीआप्पा गौंडर
रामा रेड्डी मामिडी
रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले
सांग्युसांग एस. पोंगेनर
शफी शौक
श्याम सुंदर
सिमांचल पात्रो
सुरेश हनगावडी
तगाराम भील
तेची गुबीन
तिरुवारूर भक्तवत्सलम
विश्व बंधु
युमनाम जात्रा सिंग
ADVERTISEMENT











