छत्रपती संभाजीनगर : वसतीगृहात राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ गुपचूप शूट केले, अन् बॉयफ्रेंडला पाठवले

Chhatrapati Sambhajinagar Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या दोघीही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून गेल्या तीन वर्षांपासून एकाच वसतिगृहात राहत होत्या. 19 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संशयास्पद संभाषण करत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले.

Chhatrapati Sambhajinagar Crime News

Chhatrapati Sambhajinagar Crime News

मुंबई तक

25 Jan 2026 (अपडेटेड: 25 Jan 2026, 12:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगर : वसतीगृहात राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ गुपचूप शूट केले,

point

अन् बॉयफ्रेंडला पाठवले, आयटी अ‍ॅक्टसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित करून ते आपल्या प्रियकराला पाठवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पती कामासाठी बाहेर अन् इथं पत्नीचे शेजाऱ्यासोबत संबंध; पतीला कळताच थेट प्रियकराकडे पाठवलं पण आठवड्याभरातच झाला गेम...

“फोटो कसे वाटले?", तरुणीची बॉयफ्रेंडला विचारणा, अन् सगळं प्रकरण उघडकीस 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या दोघीही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून गेल्या तीन वर्षांपासून एकाच वसतिगृहात राहत होत्या. 19 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संशयास्पद संभाषण करत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. फोनवर बोलताना “फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले? हॉट आहेत का?” असे शब्द वापरत असल्याचे ऐकून पीडितेचा संशय बळावला. त्यानंतर पीडितेने आरोपी तरुणीला रंगेहाथ पकडत तिचा मोबाइल ताब्यात घेतला. पासवर्ड विचारून मोबाइल तपासला असता कपडे बदलतानाचे आपलेच व्हिडिओ आरोपी तरुणीने चोरून काढून ते तिच्या प्रियकराला पाठवल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणीने तात्काळ सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्टसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

खासदार संजय राऊतांना कर्करोग झाल्याचं कधी समजलं? कोणता कॅन्सर झाला? स्वत: सांगितलं

    follow whatsapp