बीड : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा बिंदुसरा धरणात मृतदेह आढळला, पाली गावावर शोककळा

Beed News : बीड शहराजवळील बिंदुसरा प्रकल्प परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. संकेत तुकाराम नवले (वय 23, रा. पाली, ता. बीड) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे पाली गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

beed news

beed news

मुंबई तक

24 Jan 2026 (अपडेटेड: 24 Jan 2026, 06:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा बिंदुसरा धरणात मृतदेह आढळला

point

पाली गावावर शोककळा

Beed News, योगेश काशीद : बीड शहराजवळील बिंदुसरा प्रकल्प परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. संकेत तुकाराम नवले (वय 23, रा. पाली, ता. बीड) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे पाली गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

संकेत नवले हा दोन दिवसांपूर्वी आपल्या घरातून काही सांगून बाहेर पडला होता. मात्र, रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला; नातेवाईकांकडे विचारपूस केली, परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. संकेतचा फोनही लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली होती.

हे ही वाचा : पुणे : पतीला सोडून शाहरुखसोबत 2 महिने लिव्ह इनमध्ये राहिली नम्रता, संतापलेल्या नवऱ्याने केला खून

धरणाच्या काठावर कपडे आणि पाण्यात तरंगताना मृतदेह 

संकेतचा शोध घेत असताना बिंदुसरा धरणाच्या काठावर त्याचे कपडे आणि चप्पल आढळून आली होती. यामुळे काहीतरी अघटीत घडल्याची शक्यता ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्या दृष्टीने गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने परिसरात शोध मोहीम तीव्र केली. स्थानिक तरुणांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कालपर्यंत यश आले नव्हते. अखेर आज शनिवारी सकाळी संकेतचा मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला.

मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांनी केला पंचनामा 

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला आहे. त्यानंतर मृतदेह तपासणीसाठी बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संकेतने हे टोकाचे पाऊल का उचलले? त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

हे ही वाचा : मर्डर करुन तुरुंगात गेली अन् दुसऱ्या कैद्याच्या प्रेमात पडली, लग्नासाठी दोघं पॅरोलवर बाहेर; 15 दिवसांनी पुन्हा आत जाणार

पाली गावावर दुःखाचे सावट


संकेत हा अवघ्या 23 वर्षांचा तरुण होता. त्याच्या अशा जाण्याने नवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाली गावातील एका उमद्या तरुणाचा असा अंत झाल्याने गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस यांच्याकडून सुरू आहे.

    follow whatsapp