Buldhana News, जका खान : बुलढाणा जिल्ह्यातील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या १० वर्षीय पवन नारायण इंगळे या विद्यार्थ्याला शिक्षकाने लोखंडी पट्टीने मारहाण केली. या संदर्भात विद्यार्थ्याच्या वडिलांनी काल रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर आज त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
शाळेत नेमकं काय घडलं?
विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर त्याची आजी त्याचा गणवेश काढत होती. त्यावेळी तो मुलगा वेदनेने विव्हळू लागला. आजीने शर्ट काढताच तिला धक्काच बसला. तिला मुलाच्या पाठीवर, हातावर आणि पायावर काळे-निळे वळ उठल्याचे दिसले. आजीने ही बाब त्या मुलाच्या वडिलांना सांगितली. मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून वडीलही हादरले. वडिलांनी विचारले असता मुलाने सांगितले की, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही म्हणून त्यांनी लोखंडी पट्टीने त्याला बेदम मारले.
हे ही वाचा : झालं आता कलेक्टर होणार, 8 वी शिकलेल्या रामूने मुलीला गंडवलं, शरीरसुख घेतल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार
शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
शिक्षकाच्या या क्रूरतेची तक्रार वडिलांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी खामगाव शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे अधिकारी भागवत मुळीक यांनी माहिती दिली की, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि चाइल्ड केअर ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT











