Padma Awards : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी ५ जणांना पद्मविभूषण, १३ जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच महाराष्ट्रातील चौघांना पद्मश्री देऊन गौरवण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महाराष्ट्रातील चौघांचा पद्मश्री पुरस्काराने होणार सन्मान, कोणाकोणाचा समावेश? पहा संपूर्ण यादी
यांना मिळणार पद्मविभूषण
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत इतर पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये व्ही.एस.अच्युतानंद आणि झारखंडचे शिबू सोरेन (मरणोपरांत), केरळचे केटी थॉमस आणि पी. नारायणन, उत्तरप्रदेशचे एन. राजन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी 2019 ते 2023 दरम्यान महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. यासोबतच ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा खासदार राहिलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काही काळ त्यांनी काम केले आहे.
हे ही वाचा : बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले? सुषमा अंधारेंनी सगळं सांगितलं VIDEO
महाराष्ट्रातील चौघांना पद्मश्री
1) रघुवीर खेडकर (पद्मश्री)
2) भिकल्या लडक्या धिंडा (पद्मश्री)
3) श्रिरंग देवबा लाड (पद्मश्री)
4) आर्मिदा फर्नांडीस (पद्मश्री)
ADVERTISEMENT











