धाराशिव : झेंडावंदनासाठी उभे राहिले अन् हृदयविकाराचा झटका येऊन कोसळले, अधिकाऱ्याचा मृत्यू VIDEO

Dharashiv News : 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा शासकीय कार्यक्रम सुरू असतानाच झेंडावंदनावेळी मोहन जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते जागेवरच कोसळले. उपस्थितांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला; मात्र उपचारांपूर्वीच जागेवर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

Dharashiv News

Dharashiv News

मुंबई तक

26 Jan 2026 (अपडेटेड: 26 Jan 2026, 01:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : झेंडावंदनासाठी उभे राहिले अन्

point

हृदयविकाराचा झटका येऊन कोसळले, अधिकाऱ्याचा मृत्यू VIDEO

Dharashiv News, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या आनंदावर विरजण घालणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. उमरगा तालुक्यातील तलमोड येथे आयोजित शासकीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात झेंडावंदनासाठी उभे असताना दारूबंदी (अबकारी) विभागाचे अधिकारी मोहन जाधव यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला.  त्यानंतर काही क्षणात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी सकाळी तलमोड येथे नेहमीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचा शासकीय कार्यक्रम सुरू होता. अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणाचा क्षण जवळ आला असताना मोहन जाधव हे इतर अधिकाऱ्यांसोबत झेंडावंदनासाठी उभे होते. राष्ट्रगीत सुरू होणार असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच ते थेट जमिनीवर कोसळले. घटना लक्षात येताच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

मोहन जाधव हे उमरगा तालुक्यातील तलमोड येथे अबकारी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. या संपूर्ण घटनेचा प्रसंग कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. झेंडावंदनाच्या वेळी अधिकारी कोसळतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी शोक व्यक्त केला असून, “राष्ट्रीय सणाच्या दिवशी कर्तव्य बजावताना आलेला हा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Astrology : 'या' राशीतील लोकांना अपार धन, संपत्तीचा लाभ होणार, तर काही राशींना... जाणून घ्या राशीभविष्य

    follow whatsapp