Ajit Pawar Death : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता त्यांचं प्रायव्हेट चार्टर ऑपरेट करणाऱ्या कंपनीवर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. बारामतीतील दुर्घटनेत अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय. विमानात प्रवास करणारं कोणीही वाचू शकलेलं नाही. अजित पवार ज्या विमानामध्ये प्रवास करत होते, ते विमान Learjet 45 होते. त्या विमानाचा रजिस्ट्रेशन नंबर VT-SSK आहे. हे विमान VSR एविएशन नावाची कंपनी ऑपरेट करत होती. त्या कंपनीचे मालक विजयकुमार सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे आणि न भरुन येणारा धक्का असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ajit Pawar यांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?
वैमानिकाला धावपट्टी दिसू शकली नाही
अजित पवार हे VSR एविएशन या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते. व्ही. के. सिंग हे या कंपनीचे मालक आहेत. त्यानंतर या घटनेविषयी सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'वैमानिकांनी विमान पहिल्यांदा रनवे 29 कडून उतरण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरल्यावर त्यांनी पुन्हा रनवे 11 कडून लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय ठरला. आम्हाला या घटनेचे खूप दुःख आहे. ज्या कुटुंबांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्राथमिकदृष्ट्या असे दिसते की वैमानिकाला धावपट्टी दिसू शकली नाही. ते अतिशय अनुभवी वैमानिक होते. त्यांना 16,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता. सह-वैमानिकालाही 1500 तासांचा अनुभव होता. कॅप्टन खूपच अनुभवी होते. त्यांनी सहारा, जेटलाईट, जेट एअरवेजमध्ये काम केले होते आणि या प्रकारच्या विमानाचाही त्यांना मोठा अनुभव होता.
विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता
विमानाची देखभाल अतिशय उत्तम ठेवली होती. विमानामध्ये कोणतीही समस्या नव्हती आणि आमच्या माहितीनुसार विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. कॅप्टन सुमित कपूर माझे खूप चांगले मित्र होते. ते माझ्या भावासारखे होते. त्यांचा मुलगाही आमच्याकडेच वैमानिक आहे. कॅप्टन शांभवी पाठक माझ्या मुलीसारखी होती. ते दोघेही अत्यंत चांगली माणसे आणि उत्कृष्ट वैमानिक होते.
फिट विमानांचं उड्डाण का रद्द करु?
तुमच्या कंपनीकडे Learjet 45 प्रकारातील किती विमाने आहेत आणि त्यांची उड्डाणे तुम्ही थांबवणार का या प्रश्नालाही सिंग यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'आमच्या कंपनीकडे ७ विमाने आहेत. ती सगळी फिट विमाने आहेत. आणि तो माझा निर्णय नाही. ही विमाने जगभरात वापरली जातात आणि ती अतिशय विश्वासार्ह आहेत. त्यांची उड्डाणं का थांबवू?'
ADVERTISEMENT











