Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये 1 ऑक्टोबर 2025 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच काही विभागातील जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. या एकूण विभागात 1 ऑक्टोबर रोजी हवामानची परिस्थिती कशी असेल याबाबत महत्त्वाची अपडेट पुढे दिलेली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : डोंबिवली हादरलं! तीन वर्षाच्या चिमुरडीसह मावशीला सर्पदंश, विवाहाची ठरली होती तारीख, नंतर रुग्णालयात जाताच...
कोकण विभाग :
राज्यातील कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका नाही. हवामान विभागानुसार सध्या कोकणात पावसाची विश्रांती दिसून येईल.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश होतो. या पैकी नंदूरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यात हलक्या पावसासह विजांचा कडकडाट असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. या एकूण जिल्ह्यांपैकी बीड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर याच जिल्ह्यात नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा : तरुणाला मस्ती नडली, साप पकडताना केला दंश, नंतर तरुणाला रुग्णालयात नेलं अन् उपचारादरम्यान...
विदर्भ विभाग :
विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांचा विदर्भ विभागात समावेश होतो. यापैकी नागपूर, वर्धा, बुलढाणा, भंडारा, अमरावती या जिल्ह्यात कसलाही अंदाज वर्तवला नाही, तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत विजेसह काही ठिकाणी पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
