स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी आपण दररोज मोबाईल चार्जरचा वापर करतो. सामान्यत: मोबाईल चार्जरचा वापर करणं सुरक्षित मानलं जातं. मात्र, बऱ्याचदा मोबाईल चार्ज करताना काही जण निष्काळजीपणा करतात आणि त्यामुळे त्याचे भयंकर परिणामांच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. अमेरिकेतून अशीच एक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मोबाईल चार्जरमुळे लागला करंट...
मोबाईल चार्ज करत असताना एका मुलाला त्याचा करंट म्हणजेच झटका लागल्याचं वृत्त आहे. हा अपघात इतका भयानक होता की, यामुळे पीडित मुलाच्या गळा आणि छातीच्या त्वचेला गंभीररित्या जखम झाली आहे. त्यानंतर, त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. आता असे अपघात टाळण्यासाठी कोणती खबरदारी बाळगली पाहिजे? याबाबत सविस्तर जाणून घ्या.
हे ही वाचा: मुंबईची खबर: ग्रीन लाइन मेट्रोचं काम लवकरच सुरू होणार! परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती..
गळ्यातील चेन प्लगमध्ये अडकली अन्...
रिपोर्ट्सनुसार, संबंधित प्रकरण हे अमेरिकेतील आहे. येथील एका घरात एक्स्टेंशन बोर्डमध्ये मोबाईल चार्जर लावलं होतं. परंतु, ते चार्जर त्या बोर्डमध्ये व्यवस्थितरित्या लागलं नव्हतं. बोर्ड आणि चार्जरच्या पिनमध्ये गॅप राहिला होता. त्या बोर्डच्या शेजारीच खेळत असलेल्या एका 8 वर्षांच्या मुलाच्या गळ्यातील चेन त्या गॅपमध्ये अडकली आणि त्यामुळे त्या चिमुकल्याला जोरात करंट लागला. मुलाला वाचवण्यासाठी गळ्यातील चेन तोडून ती फेकून देण्यात आली. सुदैवाने, त्या मुलाचा जीव वाचला. या घटनेनंतर, घरातील सदस्यांनी मुलाला तातडीने रुग्णालयात नेलं आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले.
हे ही वाचा: बिझनेस पार्टनर बनला जिगरी दोस्त, पण त्यानेच बायकोसोबत अनैतिक संबंध ठेऊन केला घात, संतापलेल्या रामेश्वरने ट्रॅक्टरने चिरडलं
कोणती खबरदारी बाळगायला हवी?
1. झोपताना चार्जर प्लग-इन करून ठेवू नका. कारण, मेटल टच झाल्याने करंट लागू शकतो. त्यामुळे, अंथरूणाजवळ प्लगमध्ये चार्जर लावलं असेल तर काढून ठेवा.
2. लहान मुलांना पावर प्लगपासून दूर ठेवा. प्लगमध्ये चार्जर लावणं मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं.
3. तुमचं चार्जर जुनं झाल्यास किंवा त्याची केबल कापली असल्यास त्याचं वापर करणं बंद करा. अशा चार्जरमुळे करंट लागण्याची शक्यता उद्भवते. तसेच, जर चार्जर प्लग बसत नसेल, तर तो जबरदस्तीने आत घालण्याचा प्रयत्न करू नका. अशात, तुमचा फोन वेगळ्या प्लगने चार्ज करा.
ADVERTISEMENT











