AIIMS Research : स्टॅमिना वाढवण्यासाठी हल्ली तरुण विविध औषधांचे सेवन करतात. या औषधामुळे स्टॅमिन्यात वाढ होईल असा तरुणांचा गोड गैरसमज आहे. याचा विपरीत परिणाम त्यांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता असते. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात स्टॅमिन्यासाठी तरुण आणि पुरूष मंडळी नेमकी कोणते ड्रग्स घेतात औषधे घेतात हे महत्त्वाचं आहे. इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्री 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, हल्ली तरुण स्टॅमिना वाढण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात. या औषधांमुळे शरीरावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. यामुळे एचआयव्हीसारखा रोग निर्माण होऊ शकतो. म्हणजेच शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी तरुण उत्तेजनाच्या गोळ्यांचा डोस घेतात. संशोधनातून असं काही दिसून आले की, परदेशांतील तरुणांप्रमाणे देशातील तरुण पिढी औषधांचं सेवन करू लागली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बापरे..! अमरावतीत दहा वर्षीय मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य
एम्स दिल्लीने केलेलं हे ऑनलाईन सर्वेक्षण
संबंधित प्रकरणाचं संशोधन हे एम्स दिल्लीच्या नॅशनल डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर ने केले आहे. एम्स एनडीडीटीसी येथील प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ सरकार, प्राध्यापक डॉ. अंजू धवन आणि वरिष्ठ निवासी डॉ. वर्षा यांनी यावर संशोधन केलं. भारतातील तरुणांनी शरीरसंबंध समजून घेण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 18 वर्षे वयाहून अधिक लोकांचा समावेश होता. एम्स दिल्लीने केलेलं हे पहिलेच ऑनलाईन संशोधन असं म्हणू शकतो. या सेशनमध्ये शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी गोळ्यांचे सेवन केल्यास धोका निर्माण होईल असे सांगितले गेले.
एम्स दिल्ली येथील राष्ट्रीय औषध अवलंबित्व उपचार केंद्राचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ यांनी एका प्रसारमाध्यामाशी बोलताना सांगितलं की, हे एक ऑनलाईन सर्वेक्षण आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणाचे नंतर संशोधन करण्यात आले होते. याच सर्वेक्षणात असे दिसून आले की, लोक शरीरसंबंध ठेवण्यासाठी औषध घेत असतात. दरम्यान, तरुणांमध्ये तसेच पुरुषांमध्ये औषध घेण्याचा ट्रेंड वाढण्याची कारणे आता समोर येऊ लागली आहेत.
डॉ. सिद्धार्थ सराकार म्हणाले की, या ऑनलाइन सर्वेक्षणात 136 लोकांचा समावेश होता. त्यापैकी 75 टक्के पुरूष होते आणि 25 टक्के LGBTQ असल्याचे सांगण्यात येत आहे. 136 लोकांपैकी 46 जणांनी सांगितलं की, ते शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी गोळ्या आणि औषध घेतात. यातील 7 लोक हे एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले.
संशोधनातून असे दिसून आले की, ज्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांसोबत शरीरसंबंध ठेवले होते. तसेच काहींनी ग्रुपमध्ये शरीरसंबंध ठेवले होते, त्यांनी अनेकदा औषध घेऊन शरीरसंबंध ठेवले होते. यापैकी काही लोकांना एचआयव्हीची लागण झाली होती तर, काही लोक लैंगिक आजारांचे बळी पडले होते.
हेही वाचा : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा मोठा निर्णय
स्टॅमिना वाढवण्यासाठी लोक औषधांचा वापर का करतात?
डॉ. किशोर म्हणतात की एम्सचे हे संशोधनात देशातील लैंगिक समस्यांवरती भाष्य करते. तसेच बदलत्या लैंकिक पद्धतींवरही धोकादायक चित्र समोर येऊ लागली आहेत. या एकूण प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे. या वाढत्या लैंगिक समस्यामुळे एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
एचआयव्हीसारखा आजार
एचआयव्हीसारखा आजार संभोगावेळी कंडोमचा वापर न केल्याने होतो. म्हणजेच, जर एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवताना कंडोम वापरत नसेल तर त्याला संसर्ग होऊ शकतो. वापरल्या गेलेल्या सुईमुळेही एचआयव्हीसारखा आजार होण्याची शक्यता आहे.
गोळ्यांमळे साईड इफेक्ट्स
शरीरसंबंध ठेवण्यासाठी ज्या गोळ्यांचा वापर केला गेला होता, त्यामुळे रक्तदाब वाढतो. हर्ट अटॅक, मेंदूतील रक्तस्त्राव सारखा धोका निर्माण होतो. औषध घेतल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणाऱ्या लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. त्यानंतर ते स्वत:ला एकटे समजू लागतात त्याचा त्रास होऊ लागतो.
ADVERTISEMENT
