मोठी बातमी: अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान शेवटच्या क्षणी रद्द, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

17 Jun 2025 (अपडेटेड: 17 Jun 2025, 01:42 PM)

अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट ही शेवटच्या क्षणी अचानक रद्द करण्यात आली आहे. ज्यानंतर प्रवासी एअर इंडियावर बरीच टीका करत आहेत.

Mumbai Tak
Google CTA

अहमदाबाद: अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI-159 मंगळवारी (17 जून) तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली आहे. अचानक उड्डाण रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी आता संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांनी सांगितले की, जेव्हा ते विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना कोणतेही कारण न देता फ्लाइट रद्द झाल्याची माहिती देण्यात आली.

हे वाचलं का?

मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाड झालेले असल्याने शेवटच्या क्षणी विमानचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

हे ही वाचा>> मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया विमानात बिघाड, डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर कोलकातामध्येच...

एकाच दिवसात घडलेली ही तिसरी घटना आहे. मंगळवारीच आणखी दोन विमानांचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, विमान उड्डाणांमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत, त्यापैकी बहुतेक तांत्रिक त्रुटींमुळे उड्डाण उशिराने होत आहेत किंवा रद्द केली जात आहेत.

इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी

आज सकाळी 9.20 वाजता, कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E 2706 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली, त्यानंतर हे विमान तात्काळ नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, तात्काळ आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये ही धमकी गंभीर असल्याची पुष्टी करण्यात आली. कारण या धमकीमध्ये फ्लाइटनंबर देखील स्पष्टपणे नमूद करण्यात आला होता. ही फ्लाइट कोचीच्या दिशेने जात होती, पण धमकीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर विमानतळावर त्याचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं.

हे ही वाचा>> Air India Crash: 10 बाय 10 चं घर ते जग जिंकण्याचं स्वप्न, डोंबिवलीची रोशनी जे बोलली ते करून दाखवलं पण...

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड

त्याच वेळी, सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना तांत्रिक बिघाडामुळे कोलकाता विमानतळावर उतरवावे लागले. मंगळवारी दुपारी 12.45 वाजता फ्लाइट कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आलं. एअर इंडियाच्या विमान AI180 च्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आलं.