अकोला हादरलं, पोटच्या मुलीवर बापाचा लैंगिक अत्याचार, काकानेही अब्रू लुटली, नंतर शेजारचा आजोबाही झाला नराधम

Akola Crime News : सहनशक्ती संपल्यानंतर अखेर या चिमुकलीने शाळेतील शिक्षकांपुढे आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या चाईल्ड लाईनच्या समुपदेशन कार्यक्रमादरम्यान तिने धैर्य एकवटून घडलेला प्रकार सांगितला.

Akola Crime News

Akola Crime News

मुंबई तक

26 Dec 2025 (अपडेटेड: 26 Dec 2025, 10:36 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अकोला हादरलं, पोटच्या मुलीवर बापाचा लैंगिक अत्याचार, काकानेही अब्रू लुटली

point

नंतर शेजारचा आजोबाही झाला नराधम

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातून समोर आलेल्या एका अमानवी घटनेने संपूर्ण समाज मनाला हादरवून टाकले आहे. अवघ्या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतक्यावरच न थांबता, त्याच कुटुंबातील काकाने आणि नंतर शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीनेही या निष्पाप मुलीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. ही संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावात घडली. घर हेच सुरक्षिततेचं ठिकाण असतं, अशी सर्वसाधारण समजूत असताना या प्रकरणात मात्र घरातीलच व्यक्ती मुलीसाठी नरक ठरल्या. पीडित मुलीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अत्याचार होत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

हे वाचलं का?

सहनशक्ती संपल्यानंतर अखेर या चिमुकलीने शाळेतील शिक्षकांपुढे आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या चाईल्ड लाईनच्या समुपदेशन कार्यक्रमादरम्यान तिने धैर्य एकवटून घडलेला प्रकार सांगितला. तिचे म्हणणे ऐकून शिक्षक आणि उपस्थित अधिकाऱ्यांना धक्का बसला. या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेत शाळेचे मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी तात्काळ चाईल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांसह तेल्हारा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा : BMC Election 2026: खळबळ उडवून देणारा सर्व्हे... 'ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावं', एवढ्या टक्के लोकांनी दिला भलताच कौल!

मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू करत संबंधित आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. पीडितेचे वडील, काका आणि शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 64(2) (f), (m), 65(1) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO) कलम 4, 6 आणि 8 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाला गुन्हा क्रमांक 382/25 देण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील आणि काकाकडून गेल्या सहा दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरू होते. या प्रकरणात आरोपी वडील आणि शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मात्र, नराधम काका हा फरार आहे, तो मागील 20 दिवसांपासून पुणे येथे आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पनवेल महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने किती जागा जिंकल्या? किती होती शेकापची ताकद? इतिहास घ्या जाणून

    follow whatsapp