Akola News : राज्यातील अकोल्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका 14 वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबायांच्या त्रासाला कंटाळून 21 दिवस फरार झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी करण्यात आली होती. मुलाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर मुलगा तब्बल 1 हजार 500 किमी अंतरावर सापडला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सोलापुरात प्रियकराने साथ सोडून लग्नाचा निर्णय घेतला, नैराश्यात गेलेल्या तृतीयपंथीयाने ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं
पालकांनी मुलाला फटकारल्याने गेला घर सोडून
अकोला शहरातील खदान पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी असलेला हा किशोर 11 नोव्हेंबर रोजी पालकांनी मुलाला फटकारल्याने कोणाला काहीही न सांगिताच घरातून पळून गेला होता. या प्रकरणात किशोरच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधत गुन्हा दाखल केला.
मुलाच्या शोधासाठी पोलिसांचा 1 हजार 500 किमी प्रवास
नंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. संबंधित प्रकरणात पोलीस अधीक्षक अर्पित चांडक यांनी बुधवारी पत्रकारांनी सांगितलं की, मुलाचा शोध घेण्यासाठी कुटुंबियांना पुरेशी माहिती देता आली नाही. 11 नोव्हेंबर रोजी हा मुलगा नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना दिसत होता, त्यानंतर मुलाच्या शोधासाठी पोलीस पथकाने सात शहरांमधून 1 हजार 500 किमी अंतर कापून प्रवास केला होता.
हे ही वाचा : यवतमाळ हादरलं! पत्नीसोबत अनैतिक प्रेमसंबंध, संतापलेल्या नवऱ्याने प्रियकराला एकांतात बोलावून संपवलं
पंढरपूर रेल्वे स्टेशन आणि शहरातील इतर ठिकाणी शोध घेतला. अखेरीस 2 डिसेंबर रोजी पंढरपूरमधील सरगम चौकात हा किशोर तरुण सापडला आणि नंतर त्याला पालकांकडे सोपवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुलाला शोधून काढणाऱ्यासाठी 10 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.
ADVERTISEMENT











