यवतमाळ हादरलं! पत्नीसोबत ठेवले अनैतिक प्रेमसंबंध, संतापलेल्या नवऱ्याने लाकडी दांड्याने हल्ला करत प्रियकराला संपवलं

मुंबई तक

Yavatmal Crime : यवतमाळ घाटंजी तालुक्यात पांढुर्णी येथे अनैतिक संबंधाच्या संशयातूनच एक धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Yavatmal Crime
Yavatmal Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यवतमाळमध्ये अनैतिक संबंधातून हत्या

point

लाकडी दांड्याने तरुणावर हल्ला करत संपवलं

Yavatmal crime : यवतमाळमध्ये प्रेमप्रकरण, अनैतिक संबंधातून हत्या आणि आत्महत्येसारखे गुन्हे घडताना दिसतात. अशीच धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. या जिल्ह्यात घाटंजी तालुक्यात पांढुर्णी येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातूनच ही घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या गावातीलच प्रियकराची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या प्रकरणी आता अधिक तपास सुरु केला आहे. 

हे ही वाचा : गुंडांनी गाडी आडवत शिक्षिकेच्या कपाळातच गोळी घालत संपवलं, शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात, हादरवणारं प्रकरण

विशालच्या अनैतिक संबंधाची गावात जोरदार चर्चा 

या प्रकरणातील मृत व्यक्तीची नावं समोर आली आहेत. विशाल जगन रंदई (37) असे मृतकाचे नाव आहे. तसेच निलेश अरुण ढोणे (35) असे आरोपीचे नाव आहे. आपल्या पत्नीशी अंदाजे दोन वर्षांपासून विशालचे अनैतिक संबंध असल्याची जोरदार गावात चर्चा होती, असा संशय आता निलेशला आला होता. 

याच कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. मात्र, याबाबत खात्री झाल्यावर आरोपी अरुण ढोणे याने मृतक विशाल रंदईला गावातील एकांतात बोलावले. नंतर त्या ठिकाणी दोघांमध्ये संभाषण झाले आणि संभाषणातून वाद निर्माण झाला. 

हे ही वाचा : मुलीच्या प्रकरणावरून मुलाला उलटं टागलं, नंतर गळा चिरून केली हत्या, अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कांड

लाकडी दांड्याने विशाल रंदईवर हल्ला

घटनेदरम्यान, आरोपीने रागाच्याभरातच लाकडी दांड्याने विशाल रंदईवर हल्ला चढवला. अशातच गंभीर जखमी झालेला रंदई रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.  या झालेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. नंतर, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करू लागले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp